AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्षं पोटदुखीच्या वेदनेने तळमळत होती महिला, स्कॅनिंग केल्यावर पोटात जे दिसले ते पाहून डॉक्टरही हादरले…

या महिलेच्या पोटात एवढं दुखत होतं की तिला दवाखान्यात चकरा माराव्या लागत होत्या. शेवटी एमआरआय केल्यावर तिच्या पोटात जे दिसलं ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले.

11 वर्षं पोटदुखीच्या वेदनेने तळमळत होती महिला, स्कॅनिंग केल्यावर पोटात जे दिसले ते पाहून डॉक्टरही हादरले...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: freepik
| Updated on: Apr 25, 2023 | 2:47 PM
Share

Woman has a needle and thread stuck inside : माणसाचे आरोग्य चांगले असेल तर त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपोआप बऱ्या होतात. मात्र, कधी-कधी निष्काळजीपणाच्या अशा घटनाही समोर येतात, ज्यामध्ये रुग्ण स्वत:चा कोणताही दोष नसताना वर्षानुवर्षे वेदना (pain) सहन करत राहतो. आज अशाच एका महिलेची गोष्ट जाणून घेऊया जी तब्बल 11 वर्षांपासून पोटदुखीने (stomach pain for 11 years) त्रस्त होती. हो हे खरं आहे.

कोलंबियातील रहिवासी असलेली मारिया नावाची ही महिला 4 मुलांची आई आहे. गेल्या दशकभरापासून तिच्या पोटात सतत विचित्र दुखत होतं. सुरुवातीला तिला हे दुखणं सामान्य वाटलं. पण त्रास खूपच वाढू लागला. वेदना सहन न झाल्याने ती डॉक्टरकडे गेली. तिथे तिचा एमआरआय करण्यात आला आणि त्यामध्ये जे दिसले ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. खरंतर तेव्हा डॉक्टरांना मारियाच्या पोटात सुई-दोरा आढळला.

सर्जरीनंतर होत होत्या पोटात वेदना

कोलंबियात राहणारी असलेली मारिया 39 वर्षांची आहे. 4 मुलांना जन्म दिल्यानंतर आणखी मुले होऊ नयेत म्हणून तिचे ऑपरेशन झाले. या ऑपरेशननंतर तिला अनेक वर्षे पोटदुखीचा त्रास सुरू होता. याबाबत डॉक्टरांकडे तक्रार केली असता त्यांनी त्याला तीव्र वेदनाशामक औषध दिले. ती सांगते की पोटदुखी इतकी तीव्र होती की बराच काळ असा गेला की ती रात्र-रात्र झोपू शकत नव्हती. तिला 10 वर्षे त्रास सहन करावा लागला कारण ती ज्या गावात रहायची तेथून डॉक्टरांचा दवाखाना असलेले शहर खूपच लांब होते.

पोटातून निघाला सुई-दोरा

अखेर बरेच वर्षे वेदना सहन केल्यावर मारिया पुन्हा डॉक्टरांकडे गेली. शेवटी तिथे तिला अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय स्कॅन करण्यास सांगितले. तेव्हा तिच्या पोटात शस्त्रक्रियेची सुई आणि धागा आढळला. आणि हेच तिच्या पोट दुखण्याचे कारण असल्याचे डॉक्टरांना समजले. मात्र तेही चक्रावून गेले. हा सुई-दोरा सुमारे 4000 दिवस तिच्या पोटात होता आणि त्यामुळे तिला त्रास होत होता. जेव्हा तिच्या फॅलोपिन ट्यूबचे ऑपरेशन झाले तेव्हा डॉक्टरांच्या चुकीने हा सुई-धागा मारियाच्या पोटात राहिला, ज्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या. अखेर पोटातून तो सुई-दोरा काढण्यात आला व तिच्या वेदना थांबल्या.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.