
ट्रॅफिक जॅमपासून वाचण्यासाठी लोक अनेकदा रॅपिडो (Rapido) सारख्या बाइक टॅक्सी सेवेचा वापर करतात. पण अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या सेवांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ रॅपिडो बाइक राइड दरम्यान झालेल्या अपघाताचा आहे. यात बाइक रायडरने हेल्मेट घातलं नव्हतं तसच त्याच्यामागे बसलेल्या मुलीच्या डोक्यात सुद्धा हेल्मेट नव्हतं.
मुलगी चालू बाइकवर मागे बसून रील रेकॉर्ड असताना हा अपघात झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी रॅपिडो राइड दरम्यान एक ट्रेडिंग ट्रॅक ‘तडपाओगे तडपा लो…’ गाण्यावर व्हिडिओ बनवत होती. त्याचवेळी ड्रायव्हरचा बॅलन्स बिघडला. बाइक पलटी झाली. ही संपूर्ण घटना मुलीच्या रीलमध्ये रेकॉर्ड झाली. नेटिझन्स हा व्हिडिओ बघून हैराण झालेत.
आतापर्यंत किती लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय?
प्रियंका नावाच्या मुलीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर @bhangrabypahadan म्हणून शेअर केलाय. आतापर्यंत 15 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. व्हिडिओ शेअर करताना आपला भितीदायक अनुभव सुद्धा तिने शेअर केलाय. प्रियंकाने रॅपिडोला टॅग करुन लिहिलिय की, “एक तुम्ही होता, ज्यांच्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. तो सुद्धा तुम्ही मोडला. रॅपिडोवाल्या भय्यांनी तर सर्व देवांची आठवण करुन दिली”
मुलीचा आरोप काय?
मुलीच म्हणणं आहे की, तिने ड्रायव्हरकडे हेल्मेट मागितलं होतं. पण त्याने नकार दिला. तो स्वत: सुद्धा विनाहेल्मेट होता. मुलीचा आरोप आहे की, रायडर रॉन्ग साइडने आणि वेगात बाईक पळवत होता. त्यामुळे तिला भिती वाटली व तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण काहीवेळाने दोघे दुसऱ्या बाइकस्वाराला धडकले. सुदैवाने दोघांना मोठा मार लागला नाही.
रॅपिडोने काय उत्तर दिलं?
प्रियंकाने सांगितलं की, ‘अपघातानंतर तिने लगेच तिथे ड्रायव्हरला पैसे दिले व पायी ऑफिसला पोहोचली’ तिच्या पोस्टवर रॅपिडोने उत्तर दिलय. “तुम्ही स्वस्थ आहात, याचा आम्हाला आनंद आहे. तुमच्या सांगण्यावरुनच ड्रायव्हरवर कुठलीही कारवाई करत नाहीय”