Video : फुलं विकून घर चालवणाऱ्या महिलेचा मुलगा iPhoneसाठी 3 दिवस उपाशी, त्यानंतर आईने जे केलं…

Flower Seller Son On Hunger Strike For iPhone: मंदिराबाहेर फुलं विकून घर चालवणाऱ्या महिलेच्या मुलाने आयफोनसाठी हट्ट धरला. हा व्हिडीओ पाहून इंटरनेट युजर्सनी त्याला खडेबोल सुनावत त्याच्यावर टीका केली आहे.

Video : फुलं विकून घर चालवणाऱ्या महिलेचा मुलगा iPhoneसाठी 3 दिवस उपाशी,  त्यानंतर आईने जे केलं...
Image Credit source: social media
| Updated on: Aug 19, 2024 | 3:58 PM

सध्या जमाना स्मार्टफोनचा आहे. विविध स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध असले तरीही आयफोनची अनेकांमध्ये आजही खूप क्रेझ आहे.आयफोन शिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. एका फूलविक्रेत्या महिलेच्या मुलावरही आयफोनचं असं वेड चढलं की तो खरेदी करायचाच असा हट्ट धरत तो चक्क उपोषणालाच बसला. तीन दिवस त्याने अन्न पाणी काहीच घेतलं नाही आणि त्याने आयफोनचाच हट्ट ठरला. तीन दिवस त्याने अन्नही शिवलं नाही, ते पाहून त्याची आई अस्वस्थ झाली. मुलाची ही अवस्था तिला बघवली गेली नाही आणि खेर ती मुलासाठी आयफोन खरेदी करण्यास तयार झाली. मुलाला घेऊन ती दुकानात गेली. तेथील एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. @Incognito_qfs या X (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरून तो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अती प्रेम कायम मुलांचा नाश करतं, पालकांनी कुठं थांबायचं हे ठरवलं पाहिजे. ही कठोर परिस्थिती तरी कोणत्याच पालकांची मुलं अशी नसावीत असं या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

युजर्समध्ये घमासान

ती महिला आणि तिचा मुलगा या स्टोरमध्ये असल्याचे व्हिडीओमध्ये दिसले. त्या मुलाच्या हातात 500, 100, आणि 200 रुपयांच्या नोटा असल्याचे बंडलही दिसंतय. त्या व्हिडीओत महिलेने तिची परिस्थिती कथन केली. ‘ मी मंदिराच्या बाहेर फुलं विकते. माझ्या मुलाने तीन दिवसांपासून काहीच खाल्लं नाही कारण त्याला आयफोन खरेदी करायचा होता’ असं तिने सांगितलं.मुलाच्या हट्टासमोर मान तुकवून अखेर त्या महिलेने तिच्या मुलाला आयफोनसाठी पैसे दिलेच. व्हिडीओमध्ये ती अतिशय निराश दिसत होती. पण ते पैसे कमवून परत द्यायला हवेत, असंही तिने मुलाला बजावून सांगितलं.

 

मात्र हा व्हिडीओ पाहून इंटरनेट यूजर्सना धक्का बसला आहे. याच मुद्यावरून X वर आता रू झाला आहे. अनेक वापरकर्त्यांनी फुटबॉलपटू सॅडियो मानेचा तुटलेला फोन आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचे उदाहरण दिले. रोनाल्डोने त्याच्या 12 वर्षांच्या मुलाला अद्याप फोन दिलेला नाही कारण तो त्याच्या मुलाने तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा,असं त्याला वाटन नाहीत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून यूजर्सनी त्या मुलाला चांगलंच फटकारलं.

याला चपलेने हाणलं पाहिजे

हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स संतापलेत.या मुलाला फोनसाठी पैसे न देता, चपलेनं हाणलं पाहिजे असं एकाने लिहीलं. तर दुसऱ्या युजरने लिहीलं की – असे छपरी लोकंच इन्फ्लुएन्सर्स बनतील, असा व्हिडीओ प्रमोट करण्याची गरजंच काय ? असा सवाल त्याने विचारला. तिसऱ्या युजरने तर पालकांनाही ऐकवलं आहे – सॉरी काकू, पण उद्या हा मुलगा स्पोर्ट्स बाईक मागेल, तर तुम्ही जमीन विकाल का ? बाईकवरून स्टंट करेल आणि हातपाय मोडून घेईल. त्याला वाचवण्यासाठी अजून काय विकाल ? तो 4 दिवस जेवला नसता तर मेला नसता, अशा शब्दांत यूजरने त्या मुलाच्या आईला फटकारलंय. कष्ट करून मिळवलेला पैसा आयफोनसाठी मागणाऱ्या मुलाबद्दल अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.