AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याही ऑफिसमध्ये असे महामानव आहेत का? आजारी म्हणून सुट्टी घेतली, इन्स्टावर डान्स करताना पकडली; आता नोकरीच…

Fake mental health leave Exposed : एका महिलेने ऑफीसमध्ये खोटं सांगून सुट्टी घेतली, पण जेव्हा तिच्या बॉसच्या पत्नीने तिला इन्स्टाग्रामवर पाहिलं, तिचं सगळं प्लानिंग फिस्कटलं. ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

तुमच्याही ऑफिसमध्ये असे महामानव आहेत का? आजारी म्हणून सुट्टी घेतली, इन्स्टावर डान्स करताना पकडली; आता नोकरीच...
| Updated on: Aug 15, 2025 | 2:39 PM
Share

Fake mental health leave Exposed : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडीओज आणि पोस्ट्स व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पोस्ट खूप चर्चेत आहे. खरंतर या पोस्टमध्ये अशा एका महिला एम्प्लॉयी बद्दल सांगण्यात आलं आहे, जिने बॉसला खोटं सांगून सुट्टी घेतली होती. मात्र असं करणं तिला खूपच भारी पडलं कारण तिच खोट तिच्यावरच उलटलं . कारण सुट्टी घेऊन ती लग्नाला गेली होती, पण तिथेच तिचं बिंग फुटलं. नाही, नाही, तिथे तिचा बॉस वगैरे आला नाही, पण एका रीलमुळे तिचं पितळं उघडं पडलं.

मेंटल हेल्थचं कारण सांगून घेतली सुट्टी

एका कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने मानसिक आरोग्याचे खोटे कारण सांगून तिच्या बॉसकडून रजा घेतली. पण, त्या मुलीचे रहस्य लवकरच उघड झाले. खरंतर, बॉसने तिला रजा दिली, परंतु बॉसच्या पत्नीने त्या मुलीला इंस्टाग्रामवरील एका रीलमध्ये पाहिलं. तिचं खोटं समोर आल्यावर अखेर ऑफीसच्या HRने त्या महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं.

कझिनने सांगितली पूर्ण कहाणी

त्या महिला कर्मचाऱ्याच्या चुलत बहिणीने या संपूर्ण घटनेची माहिती रेडिटवर शेअर केली. तिथे तिने एका पोस्टद्वारे सांगितले की तिच्या चुलत बहिणीने मनसिक आरोग्याचं कारण देत तिने बॉसक़ून 3 दिवसांची सुट्टी घेतली. तिची सुट्टी मंजूर झाली, सगळं काही क्लिअर होतं, ठीक सुरू होतं. मात्र त्यानंतर त्याच बॉसच्या पत्नीने इ्स्टाग्रामवर एका वेडिंग फोटोग्राफरच्या रीलमध्ये त्या कर्मचारी महिलेला पाहिलं. छानसा लेहंगा घालून ती डान्स करत होती, मग बॉसच्या पत्नीने अगदी स्लो मोसनमध्ये तो व्हिडीओ पाहिला.

त्या पोस्टमध्ये त्या कझिनने हेही शेअर केलं की तिच्या बहिणींचा लेहंगा जितक्या किमतीचा होता, तेवढा तर माझा संपूर्ण बँक बॅलन्स पण नाहीये. बॉसच्या पत्नीने पाहिल्यावर माझ्या बहिणीचं खोटं पकडलं गेलं आणि चोरी पकडली गेल्यामुळे आता ती बहीण माझ्याकडे कॅन्व्हामध्ये खोट सायकियाट्रिस्टचं सर्टिफिकेट बनवण्याबद्दल विचारत्ये.

नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट्स

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी खूप कमेंट केल्या. एकीकडे काही लोक हे महिलेची खिल्ली उडवताना दिसले, तर दुसरीकडे काही लोकांनी तिला पाठिंबा दिल. रेडिटवर व्हायरल झालेल्या या पोस्टवर एका युजरने लिहिले- जर एचआर या रेडिट पोस्टपर्यंत पोहोचला तर त्रास होईल. महिलेला पाठिंबा देताना दुसऱ्या युजरने लिहिले- ती रजा घेऊ शकते आणि काहीही करू शकते, ऑफिसच्या लोकांना काय फरक पडतो. आणखी एका युजरनेदेखील त्या महिलेला फुल सपोर्ट दर्शवला. मेंटल हेल्थसाठी सुट्टी घेणं याचा अर्थ पूर्ण दिवस घरात बसून काढावा असं नाही ना, अशी कमेंट एकाने केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.