
Fake mental health leave Exposed : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडीओज आणि पोस्ट्स व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पोस्ट खूप चर्चेत आहे. खरंतर या पोस्टमध्ये अशा एका महिला एम्प्लॉयी बद्दल सांगण्यात आलं आहे, जिने बॉसला खोटं सांगून सुट्टी घेतली होती. मात्र असं करणं तिला खूपच भारी पडलं कारण तिच खोट तिच्यावरच उलटलं . कारण सुट्टी घेऊन ती लग्नाला गेली होती, पण तिथेच तिचं बिंग फुटलं. नाही, नाही, तिथे तिचा बॉस वगैरे आला नाही, पण एका रीलमुळे तिचं पितळं उघडं पडलं.
मेंटल हेल्थचं कारण सांगून घेतली सुट्टी
एका कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने मानसिक आरोग्याचे खोटे कारण सांगून तिच्या बॉसकडून रजा घेतली. पण, त्या मुलीचे रहस्य लवकरच उघड झाले. खरंतर, बॉसने तिला रजा दिली, परंतु बॉसच्या पत्नीने त्या मुलीला इंस्टाग्रामवरील एका रीलमध्ये पाहिलं. तिचं खोटं समोर आल्यावर अखेर ऑफीसच्या HRने त्या महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं.
कझिनने सांगितली पूर्ण कहाणी
त्या महिला कर्मचाऱ्याच्या चुलत बहिणीने या संपूर्ण घटनेची माहिती रेडिटवर शेअर केली. तिथे तिने एका पोस्टद्वारे सांगितले की तिच्या चुलत बहिणीने मनसिक आरोग्याचं कारण देत तिने बॉसक़ून 3 दिवसांची सुट्टी घेतली. तिची सुट्टी मंजूर झाली, सगळं काही क्लिअर होतं, ठीक सुरू होतं. मात्र त्यानंतर त्याच बॉसच्या पत्नीने इ्स्टाग्रामवर एका वेडिंग फोटोग्राफरच्या रीलमध्ये त्या कर्मचारी महिलेला पाहिलं. छानसा लेहंगा घालून ती डान्स करत होती, मग बॉसच्या पत्नीने अगदी स्लो मोसनमध्ये तो व्हिडीओ पाहिला.
त्या पोस्टमध्ये त्या कझिनने हेही शेअर केलं की तिच्या बहिणींचा लेहंगा जितक्या किमतीचा होता, तेवढा तर माझा संपूर्ण बँक बॅलन्स पण नाहीये. बॉसच्या पत्नीने पाहिल्यावर माझ्या बहिणीचं खोटं पकडलं गेलं आणि चोरी पकडली गेल्यामुळे आता ती बहीण माझ्याकडे कॅन्व्हामध्ये खोट सायकियाट्रिस्टचं सर्टिफिकेट बनवण्याबद्दल विचारत्ये.
नेटीझन्सच्या भन्नाट कमेंट्स
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी खूप कमेंट केल्या. एकीकडे काही लोक हे महिलेची खिल्ली उडवताना दिसले, तर दुसरीकडे काही लोकांनी तिला पाठिंबा दिल. रेडिटवर व्हायरल झालेल्या या पोस्टवर एका युजरने लिहिले- जर एचआर या रेडिट पोस्टपर्यंत पोहोचला तर त्रास होईल. महिलेला पाठिंबा देताना दुसऱ्या युजरने लिहिले- ती रजा घेऊ शकते आणि काहीही करू शकते, ऑफिसच्या लोकांना काय फरक पडतो. आणखी एका युजरनेदेखील त्या महिलेला फुल सपोर्ट दर्शवला. मेंटल हेल्थसाठी सुट्टी घेणं याचा अर्थ पूर्ण दिवस घरात बसून काढावा असं नाही ना, अशी कमेंट एकाने केली.