जेव्हा पोलीस स्री-पुरुष समानता जरा जास्तच मनावर घेतात ! एक लाठी बसताच महिलेचे आंदोलन स्थगित, व्हिडीओ व्हायरल
पोलीसांचा मार नेहमीच आंदोलकांना पांगवण्यास पुरेसा असतो. अशात एका नव आंदोलक महिलेलाही पोलिसांचा प्रसाद मिळतो. त्यानंतर तिची जी अवस्था होत ते पाहून हसावे की रडावे हे कळत नाही...

महिलांना समाजात नेहमीच पुरुषांच्या तुलनेत कमजो समजले जाते.त्यांच्या ताकदीला तितका प्रतिसाद दिला जात नाही. त्यांना मोलमजुरीचे वेतन देतानाही पुरुषांच्या पेक्षा कमी पैसा हातावर ठेवले जातात. अशात एक महिला एका निदर्शनात आपली ताकद दाखवण्यासाठी पोहचली. परंतू तिचा हा निर्णय तिच्यावरच उलटला गेला. व्हिडीओत पोलिसांची एक लाठी तिच्यावर पडताच या महिलेच्या भावना अनावर झाल्या. तिने रस्त्यावर फतकल मांडत जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. तिची अवस्था पाहून आंदोलन पडल्याची ही भयंकर शिक्षा असते हे तिला चांगलेच कळल्याचे भाव तिच्या आकांताने दिसले. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.
लाठी पडल्यानंतर जोरजोराने ओरडू लागली महिला
वास्तविक, सोशल मीडिावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या एक महिला रस्त्यावर सुरु असलेल्या निदर्शनात सहभागी असल्याचे दिसते. पोलिस या निदर्शकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर सौम्य लाठीमार करतात. त्यामुळे रस्त्यावर निदर्शक वाट भेटेल ते पसार होतात. त्यात अनेकांना पोलिसांच्या लाठीचा चांगलाच प्रसाद मिळतो. या महिलेलाही तो मिळतो. त्यानंतर ही महिला वेदनेने कळवले. आणि रस्त्याच्या मधोमध बसून ओरडू लागतो. स्वत:च्या तोंडावर हातावर बोंबलू लागते. त्यानंतर स्वत:च्या थोबाडावर हात मारुन चुक झाली मी या निदर्शनांना आले असेच जणू तिचे हावभाव पाहून वाटते.
रस्त्याच्यामध्ये फतकल मांडते
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस लाठीमार करतात. तेव्हा ही महिला देखील पोलिसांच्या लाठी हल्ल्यात सापडते. आणि या महिलेलाही पोलिसांच्या लाठीचा हलकासा प्रसाद मिळतो. परंतू वेदनेने या महिलेचा स्वत:वरचा ताबा सुटतो. आणि ती रस्त्यावरच फतकल मांडून ओरडू लागते. हा व्हिडीओ पाहून एकतर तुम्हाला तिच्या वेदनेचे तिची दया येईल किंवा हसू तरी येईल असा हा व्हिडीओ आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
View this post on Instagram
युजर्सच्या प्रतिक्रीया
या व्हिडीओला loveakurdi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांना लाईक ही केले आहे. या व्हिडीओ अनेक युजर्सनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलेय की ..महिला कधी पुरुषांची बरोबरी करु शकत नाहीत. एका युजरने लिहीलेय की पोलिसांच्या अशा लाठ्या तर पुरुष अनेक वर्षांपासून खात आले आहेत. एकाने लिहीलंय की दीदींची हालत खराब झाली..
