Video | केस धुताना महिलेची सारखी चुळबूळ, शेवटी हेअर स्टायलिस्टला राग अनावर, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 13, 2021 | 8:46 PM

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा एका सलूनमधील आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सलूनमध्ये एक महिला आपल्या केशभूषा करायला आलेली आहे.

Video | केस धुताना महिलेची सारखी चुळबूळ, शेवटी हेअर स्टायलिस्टला राग अनावर, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !
young-woman salon viral video

Follow us on

मुंबई : सोशल मीडियाचं जग मोठं मजेदार आहे. या ठिकाणी कधी काय चर्चेत येईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओसुद्धा असाच काहीसा आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांना हसू फुटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिहीओला पाहून नापसंदी व्यक्त केली आहे. (Women disturbing while washing hair hairstylist sprayed water on her face women saloon video went viral on social media)

शांत न बसता चुळबूळ महिलेची चुळबूळ

सुंदर दिसायला प्रत्येकालाच आवडते. याच सुंदरतेसाठी महिला वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरताना दिसतात. सुंदर दिसण्यासाठी त्या ब्यूटी पार्लर तसेच सलूनमध्येसुद्धा जातात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा एका सलूनमधील आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सलूनमध्ये एक महिला केशभूषा करायला आलेली आहे. यावेळी हेअर स्टायलिस्ट या महिलेचे केस स्वच्छ करत आहे. मात्र, यावेळी व्हिडीओतील महिली शांत न बसता चुळबूळ करत आहे.

मान वर करत महिलेने मोबाईल घेतला

हेअर स्टायलिस्ट केस स्वच्छ करत असताना व्हिडीओतील महिला सुरुवातीला तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारताना दिसतेय. तसेच मान मागे-पुढे करत ती मैत्रिणीजवळचा मोबाईल घेऊन त्यामध्ये डोकं घालून बसली आहे. या प्रकारामुळे हेअर स्टायलिस्टला वैताग आला आहे.

हेअर स्टायलिस्ट वैतागला

त्यानंतर मोबाईल चाळून झाल्यानंतर ही महिला पुन्हा एकदा आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारते आहे. तसेच आपली मान वर उचलून हातवारे करत आहे. या सर्व प्रकारामुळे हेअर स्टायलिस्टला त्याचे काम नीट करता येत नाहीये. केस चांगले धुता येत नसल्यामुळे त्याला काय करावे हे समजत नाहीये.

हेअर स्टायलिस्टने वैतागून चेहऱ्यावर पाणी टाकले

शेवटी चुळबूळ न थांबल्यामुळे वैतागून हेअर स्टायलिस्टने समोर झोपलेल्या महिलेवर चक्क पाणी टाकले आहे. अचानकपणे चेहऱ्यावर पाणी ओतल्यामुळे ही महिला चांगलीच गोंधळली आहे. तिला काय करावे हे समजत नाहीये. हेअर स्टायलिस्टने चेहऱ्यावर पाणी ओतल्यामुळे सलूनमधील इतर महिलासुद्धा हेअर स्टायलिस्टकडे आश्चर्याने पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Jamie Gnuman197… या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नवरदेवाने रोमँटिक अंदाजात गुलाबजाम भरवला, नवरीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी, पाहा नेमकं काय घडलं ?

Video | वयाची साठी पार केलेल्या आजीचा जबरदस्त डान्स, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

(Women disturbing while washing hair hairstylist sprayed water on her face women saloon video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI