Video | वयाची साठी पार केलेल्या आजीचा जबरदस्त डान्स, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !

सध्या 63 वर्षाच्या एका आजीबाईचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही आजीबाई डान्स करताना दिसत आहेत.

Video | वयाची साठी पार केलेल्या आजीचा जबरदस्त डान्स, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !
Ravi Bala Sharma grandmother viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच शेकडो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे प्राणी-पक्ष्यांचे असतात. तर काही व्हिडीओंमध्ये नेटकरी त्यांच्यातील कलाकारी सादर करताना दिसतात. सध्या 63 वर्षाच्या एका आजीबाईचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई डान्स करताना दिसत असून नेटकरी या आजीबाईना चांगलीच दाद देत आहेत. (dancing grandmother dancing on mohe rang do laal song video went viral on social media)

साठी पार केलेल्या आजीबाईंचा सुंदर डान्स

आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मनात इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही काम करु शकतो. सध्या हीच गोष्ट एका 63 वर्षीय आजीने शक्य करुन दाखवली आहे. या आजीचे नाव रवी बाला शर्मा (Ravi Bala Sharma) असून त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वयाने साठी पार केलेली असली तरी या आजी अतिशय सुंदर डान्स करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये त्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने डान्स केलेल्या मोहे रंग दो लाल या गाण्यावर नृत्य करत आहेत. या आजीबाईंचा हा क्लासिकल डान्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत.

चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे

या आजीने डान्स करताना केलेले हावभाव हे विशेष पाहण्यासारखे आहेत. तसेच या आजीने त्यांच्या देहबोलीच्या मदतीने गाण्यातील शब्दांवर भर देत अतिशय जबरदस्त डान्स केला आहे. रवी बाला शर्मा (Ravi Bala Sharma) या बॉलिवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करतात. याच डान्सचे व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Bala Sharma (@ravi.bala.sharma)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या आजींचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकित झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून नेटकरी त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला नेटकरी  मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | ढोलकीच्या तालावर “हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद”, मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कमकुवत हृदय असणाऱ्यांनी व्हिडीओ पाहू नका, रात्री पाहाल तर…..

Video | बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेग, सोडा बॉटलचे झाकण उघणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल

(dancing grandmother dancing on mohe rang do laal song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI