AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीच्या हातात कचऱ्याच्या पिशवीसारखी दिसणाऱ्या या बॅगची किंमत वाचून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात

प्रसिद्ध चिनी अभिनेत्रीच्या हातात पिवळ्या रंगाची प्लास्टिकची बॅग पहायला होती. ही बॅग इतकी व्हायरल झाली की अनेकांनी फॅशनवरून अभिनेत्रीची खिल्ली उडवली. परंतु त्याची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील.

अभिनेत्रीच्या हातात कचऱ्याच्या पिशवीसारखी दिसणाऱ्या या बॅगची किंमत वाचून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात
व्हायरल बॅगImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 9:16 AM
Share

सोशल मीडियावर सध्या एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीची खूप चर्चा होत आहे. या फोटोमध्ये ही पिशवी जितकी साधी दिसते, तितकी ती नाहीये. प्रसिद्ध चिनी अभिनेत्री झांग जिंगयीने बीजिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ही पिशवी हातात घेऊन पोहोचली होती. महोत्सवातील तिचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर फॅशन सेन्सविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. अभिनेत्रीने हातात धरलेली ही कोणतीही साधी प्लास्टिकची पिशवी नसून प्रसिद्ध फॅशन ब्रँड बॅलेन्सियागाची सर्वांत महागडी ट्रॅश बॅग असल्याचं अनेकांनी म्हटलंय. या बॅगची किंमत वाचून तुम्ही मात्र डोक्याला हात मारून घ्याल. कारण जी प्लास्टिकची पिशवी आपल्याकडे दुकानातून एखादं सामान आणायला किंवा कचऱ्यासाठी वापरली जाते, तशाच डिझाइनमध्ये ही लक्झरी ब्रँड बनवण्यात आली आहे.

या बॅलेन्सियागाच्या बॅगची किंमत अंदाज 1790 डॉलर म्हणजेच सुमारे दीड लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी या बॅगची खिल्ली उडवली आहे, तर काहींनी त्याला नवीन फॅशन ट्रेंड असंही म्हटलंय. ‘फॅशन इंडस्ट्री अनेक वर्षांपासून स्वस्त वस्तू जास्तीत जास्त किंमतीत विकत आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत आणि हा त्यापैकीच एक आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. सोशल मीडियावर झालेल्या चर्चांनंतर अखेर झांग जिंगयीने स्वत:च त्याविषयी खुलासा केला. तिने सांगितलं ही बॅग कोणत्याही फॅशन ब्रँडची नसून तिच्या ‘द वन’ या चित्रपटातील तो एक प्रॉप होता. चित्रपटात त्या बॅगला एक विशेष महत्त्व आहे.

याआधी मोठमोठ्या फॅशन ब्रँड्सने इथून-तिथून डिझाइन्सची कॉपी करून ब्रँडच्या नावाखाली ते मोठ्या किंमतीला विकले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीतही असाच प्रकार पहायला मिळाला. ‘प्राडा’ने या कोल्हापुरी चपलांची डिझाइन कॉपी केली होती आणि त्यावर मोठा प्राइज टॅग लावला होता. लक्झरी ब्रँड्सने असा प्रकार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यावरून अनेकदा मोठमोठ्या ब्रँड्सवर नेटकऱ्यांनी टीका केली होती.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?