60 व्या वर्षी रामदेव बाबांची घोड्यासोबत रेस, कोण जिंकलं?; निकाल ऐकून धक्का बसेल; श्वास रोखणारा VIDEO व्हायरल
Ramdev: घोड्यासोबत रामदेव बाबांची रेस, वयाच्या 60 व्या वर्षी त्यांचं फिटनेस पाहून व्हाल चकित... पण जिंकतं कोण? व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..., सोशल मीडियावर रामदेव बाबा यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

योगगुरु रामदेव बाबा कायम त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. योगबद्दल मार्गदर्शन करत रामदेव बाबा सर्वांना फिट राहण्यासाठी आवाहन करत असतात. वयाच्या 60 व्या वर्षी देखील रामदेवर बाबा फिट आहे. त्यांच्या फिटनेसपुढे 20 – 25 वयाचे तरुण देखील फेल आहेत. योग गुरु नेहमी लोकांना योगाचा प्रचार आणि निरोगी राहण्याचे मार्ग सांगत असतात.
आता बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रामदेव योगासने करण्याचा सल्ला देत नसून या वयातही आपला फिटनेस दाखवत आहेत. रामदेव बाबा यांनी स्वतःचा एक व्हिडीओ एक्सवर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रामदेव बाबा घोड्यासोबत शर्यद लावताना दिसत आहेत.
View this post on Instagram
रामदेव बाबा यांनी वयाच्या 60 व्या वर्षी घोड्यासोबत शर्यत लावून सर्वांना चकित केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामदेव बाबा यांनी शर्यतीत घोड्याला देखील मागे टाकलं आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर कमेंट करत लोकं प्रतिक्रिया देत आहे. अनेक जण त्यांच्या फिटनेसचं कौतुक देखील करत आहेत.
योगगुरू रामदेव यांनी पतंजली योगपीठ संकुलात घोड्यासोबत ही शर्यत लावली होती. याद्वारे त्यांनी पतंजलीच्या उत्पादनांची जाहिरातही केली आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी हे देखील सांगितलं आहे की, या उत्पादनांचा वापर करून तुम्ही नेहमीच तरुण राहाल. हे उत्पादन घोड्याप्रमाणे वेगाने धावण्याची शक्ती, मजबूत प्रतिकारशक्ती आणि वृद्धत्वविरोधी शक्ती देते.
