परदेशात राहण्याची आहे इच्छा? तर फक्त 5 हजार रुपयांमध्ये तुम्ही ‘या’ देशात होऊ शकता स्थायिक
अनेकांना परदेशात राहण्याची इच्छा असते. पण अनेकांनी फार कमी संधी मिळते, तर काहींना संधी मिळतच नाही. अशात भारतीयांना फक्त 5 हजार रुपयांमध्ये परदेशात राहता येणार आहे... तर त्या देशाबद्दल घ्या जाणून

भारतातील असंख्य नागरिक दुसऱ्या देशांमध्ये स्थायिक होतात. तर इतरांप्रमाणे आपण देखील परदेशात स्थायिक व्हायला पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते. पण परदेशात स्थायिक होण्यासाठी फार कमी संधी मिळतात. पण आता तुम्हाला परदेशात स्थानिक होता येणार आहे. आज अशा देशाबद्दल जाणून घेऊ जिथे तुम्ही फक्त 5 हजार रुपयांमध्ये राहू शकता. तर तुम्ही जपान या देशात फक्त 5 हजार रुपयांमध्ये राहू शकता.
भारतीयांच्या मनात जपानबद्दल नेहमीच एक कोपरा राहिला आहे, मग तो भारताशी जोडलेल्या जपानी संस्कृतीमुळे असो किंवा जपानी लोकांच्या प्रामाणिकपणा आणि शिस्तीमुळे असो. तर तुम्ही देखील जपानमध्ये राहू शकता. कायमस्वरूपी निवासस्थान म्हणजे तुम्ही जपानमध्ये तुम्हाला हवं तोपर्यंत राहू शकता. तुम्हाला तुमचा व्हिसाचे वारंवार नूतनीकरण करण्याची चिंता करावी लागणार नाही. परंतु यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.
सर्वात मोठी अट म्हणजे तुम्हाला जपानमध्ये किमान 10 वर्षे वास्तव्य करावं लागेल. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल आणि तुमच्या कमाईतून तुमचे खर्च भागवू शकत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा इमिग्रेशन नियमांचं उल्लंघन करण्याचा इतिहास नसावा. जर तुम्ही जपानी नागरिकाशी किंवा पूर्वीच्या पीआर असलेल्या व्यक्तीशी लग्न केलं असेल आणि लग्नाला 3 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असेल, तर तुम्ही 1 वर्ष जपानमध्ये राहिल्यानंतर अर्ज करू शकता. जपानी नागरिकांच्या किंवा पीआर धारकांच्या मुलांनाही 1 वर्ष राहिल्यानंतर अर्ज करण्याची संधी आहे.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये वैध पासपोर्ट, निवासी कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट, कर भरल्याचा पुरावा आणि हमी दस्तऐवज यांचा समावेश असेल. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला लग्नाची कागदपत्रे देखील द्यावी लागतील. सर्व कागदपत्रे जपानी भाषेत किंवा जपानी भाषांतरासह असली पाहिजेत.
अर्ज करण्यासाठी, तुम्हाला जवळच्या इमिग्रेशन ब्युरोमध्ये सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला 8 हजार येन शुल्क भरावे लागेल. जे महसूल स्टॅम्पद्वारे दिले जाते. या प्रक्रियेस अंदाजे 4 ते 8 महिने लागू शकतात. पीआर मिळाल्यानंतर, तुम्हाला नवीन रेसिडेन्सी कार्ड घ्यावे लागेल परंतु लक्षात ठेवा. पीआरसाठी, तुम्हाला दरवर्षी किमान 6 महिने जपानमध्ये राहावे लागेल.
जपान हे करत आहे कारण वृद्धांची संख्या वाढत आहे आणि काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी होत आहे. यासाठी ते जगभरातील व्यावसायिकांना आमंत्रित करत आहे. जर तुम्ही जपानमध्ये राहण्याचे स्वप्न पाहत असाल तर प्रथम संपूर्ण नियोजन करा आणि नंतर जपानमध्ये आरामात राहा.
