Video | हेल्मेट घालून थाटात निघाली, मध्येच कारला धडकली, थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

सध्या मात्र, एका तरुणीसोबत घडलेल्या एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोहून तुमच्याही अंकावर काटा येईल.

Video | हेल्मेट घालून थाटात निघाली, मध्येच कारला धडकली, थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
accident viral video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 08, 2021 | 11:28 PM

मुंबई : रहदारीचे नियम न पाळल्यामुळे रोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होतो. एका छोट्याशा चुकीमुळे हे अपघात होतात. यातील काही अपघात अतिशय भीषण असतात. अशा अनेक अपघाताचे व्हिडीओ यापूर्वी समोर आलेले आहेत. सध्या मात्र, एका तरुणीसोबत घडलेल्या एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोहून तुमच्याही अंकावर काटा येईल. (young girl made horrifying accident video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक अपघात दाखवण्यात आलेला आहे. स्कुटीवर बसून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत हा अपघात घडला आहे. एका कारला टक्कर दिल्यामुळे व्हिडीओतील तरुणी दूर फेकली गेली आहे. अतिशय गंभीर अपघात होऊनही डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तरुणीचा जीव वाचला आहे.

तरुणीला स्कुटीवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही

व्हिडीओमध्ये एक कार रस्त्याने जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. ही कार रस्त्यावर वळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एक-दोन वाहने येत आणि जात असल्यामुळे कारचालक मोठ्या काळजीने कार वळवतो आहे. मात्र, मध्येच एक तरुणी स्कुटी घेऊन आली आहे. वेग जास्त असल्यामुळे या तरुणीला स्कुटीवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही. परिणामी व्हिडीओतील तरुणीने कारला धडक दिली आहे. कारला जोरदार धडक दिल्यामुळे ही तरुणी रस्त्यावर जोरात पडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तरुणीला मार लागलेला नाही.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी वाहन चावलताना काळजी घेणे गरजेचे आहे, असे म्हणत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला उत्तर प्रदेश पोलिसात नोकरीवर असलेल्या सचिन कौशिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ 

इतर बातम्या :

Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं ‘ते’ ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता……

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

(young girl made horrifying accident video went viral on social mediav

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें