AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूपूर्वी ‘देसी’ युट्यूबर मालती चौहानचा अखेरचा व्हिडीओ; पतीवर गंभीर आरोप

प्रसिद्ध युट्यूब मालती चौहान तिच्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मालतीचे युट्यूबवर दोन चॅनल्स आहेत आणि दोन्ही चॅनल्सचे लाखो फॉलोअर्स आहेत. मृत्यूपूर्वी तिने युट्यूवर अखेरचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये ती तिच्या पतीवर आरोप करताना दिसत आहे.

मृत्यूपूर्वी 'देसी' युट्यूबर मालती चौहानचा अखेरचा व्हिडीओ; पतीवर गंभीर आरोप
Youtuber Malti ChauhanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2023 | 10:36 AM
Share

उत्तरप्रदेश : 24 नोव्हेंबर 2023 | उत्तरप्रदेशमधील संत कबीर नगरमध्ये राहणारी प्रसिद्ध युट्यूबर मालती चौहानचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मालती तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या निधनाने परिसरात खळबळ माजली आहे. मृत्यूच्या काही तास आधी मालतीने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये तिने सांगितलं होतं की ती माहेरच्या घरातून सासरी जात आहे. “माझा पती मला मारो किंवा काही करो.. मला माहीत नाही”, असं ती या व्हिडीओत म्हणतेय.

या व्हिडीओत मालती पुढे म्हणते, “सासरच्यांचं घर मी बनवलं आहे. त्यावर माझा हक्क आहे. तिथे राहण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही. जर मला मारहाण झाली किंवा माझं काही बरंवाईट झालं तर त्याला जबाबदार माझा पती विष्णू चौहान असेल. जर माझ्या पतीला कोणा दुसऱ्यासोबत व्हिडीओ बनवायचा असेल तर तो खुशाल बनवू शकतो. मी माझा युट्यूब चॅनल बंद करणार नाही. मी माझ्या फॉलोअर्सना विनंती करते की त्यांनी मला पाठिंबा द्यावा.” मालतीचा हा व्हिडीओ अखेरचा असेल, याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती.

हे संपूर्ण प्रकरण महुली ठाणा क्षेत्रातील काली जगदीशपूर गावातील आहे. याच ठिकाणी मालती चौहान मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूबद्दल कळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यादरम्यान मालतीच्या वडिलांनी जावईवर आरोप केला आहे. “माझी मुलगी असं करूच शकत नाही. हे नक्कीच माझ्या जावयाने तिच्यासोबत केलं असेल. तो नेहमी तिला मारहाण करायचा आणि तिला धमकी द्यायचा”, असे आरोप मालतीच्या वडिलांनी केले आहेत. मालतीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मालतीचा शेवटचा व्हिडीओ

मालती चौहान ही गरीब कुटुंबातील होती. देसी स्टाइल रिल्स आणि व्हिडीओजमुळे तिला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली होती. ती दररोजच्या जीवनातील व्हिडीओ शूट करून युट्यूबवर अपलोड करायची. मालतीचे युट्यूबवर दोन चॅनल आहेत. मालती चौहान फन या तिच्या युट्यूब चॅनलचे 6 लाख 59 हजार सबस्क्राइबर्स आहेत. तर मिस्टर युवराज फन नावाच्या चॅनलचे 6 लाख 44 हजार सबस्क्राइबर्स आहेत. तिच्या व्हिडीओला हजारो, लाखो व्ह्यूज मिळायचे. युट्यूब चॅनलद्वारे तिची चांगली कमाई व्हायची. अनेकदा तिने पती विष्णूसोबतही व्हिडीओ शूट करून अपलोड केले आहेत.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?