AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blinkit आणि Instamart ला टक्कर देण्यासाठी Zepto देणार 99 रूपयांवरील प्रत्येक ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी

डिलिव्हरी ॲप्समध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे blinkit, swiggy,instamart यांसारख्या इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्सवरील प्रत्येक ऑर्डरमागे हँडलिंग चार्ज, कन्वीनियंस चार्ज, सुविधा चार्जेस असे शुल्क आकारले जातात. पण यासर्व ॲप्सला टक्कर देण्यासाठी झेप्टोने (zepto)मात्र ऑर्डस डिलिव्हरीवरील सर्व चार्जेस काढून टाकले आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

Blinkit आणि Instamart ला टक्कर देण्यासाठी Zepto देणार 99 रूपयांवरील प्रत्येक ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी
ZeptoImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 24, 2025 | 4:04 PM
Share

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म झेप्टोने ग्राहकांना एक छान भेट दिली आहे. कंपनीने सर्व ऑर्डरवरील हँडलिंग फी, सर्ज फी आणि रेन चार्जेस पूर्णपणे काढून टाकले आहेत. शिवाय 99 रूपयांपेक्षा जास्त ऑर्डरसाठी डिलिव्हरी आता पूर्णपणे मोफत केली आहे. यामुळे ब्लिंकिट आणि स्विगी, इन्स्टामार्ट सारख्या नावाजलेल्या इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्स यांच्यामध्ये आता झेप्टो हा ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त पर्याय बनला आहे. त्यामुळे या झेप्टो आता या सर्व डिलिव्हरी ॲप्सला मोठी टक्कर देत आहे.

नवीन झेप्टो एक्सपिरीयन्स काय आहे?

झेप्टोच्या नवीन ‘ऑल न्यू झेप्टो एक्सपिरीयन्स’ अंतर्गत ग्राहकांना आता कोणत्याही ऑर्डरवर कोणतेही हँडलिंग शुल्क, सर्ज किंवा रेन शुल्क आणि 99 रूपयांपेक्षा जास्त ऑर्डरवर कोणतेही डिलिव्हरी शुल्क द्यावे लागणार नाहीये. त्याचबरोबर 99 रूपयांपेक्षा कमी किंमतीची ऑर्डरवर तुम्हाला फक्त 30 रूपये डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागणार आहेत. परंतु आता जास्त किंमतीच्या ऑडर्समागे कोणतेही स्मॉल कार्ट शुल्क किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे झेप्टोची 99 रूपयांची मोफत डिलिव्हरी मर्यादा ही इतर सर्व डिलिव्हरी ॲप्सपैकी कमी आहे. कंपनीने सिगारेट आणि तंबाखूवरील लागणारे सुविधा शुल्क देखील काढून टाकले आहे.

झेप्टो बनला ब्लिंकिट आणि इन्स्टामार्टपेक्षा सर्वात स्वस्त ॲप

  • इतर ॲप्सच्या तुलनेत झेप्टोचे किंमत मॉडेल सर्वात किफायतशीर आहे.
  • 99 रूपयांपेक्षा कमी किमतीच्या ऑर्डरसाठी झेप्टो फक्त 30 रूपये डिलिव्हरी शुल्क आकारत आहे व इतर कोणतेही शुल्क नाही.
  • ब्लिंकिट 99 रूपयांपेक्षा कमी किमतीच्या ऑर्डसवर 54 रूपये शुल्क आकारते. 30 रूपये डिलिव्हरी + 4 रूपये हँडलिंग + 20 रूपये स्मॉल कार्ट शुल्क
  • इन्स्टामार्ट सुमारे 65 रूपये शुल्क आकारते. जसे की एखाद्या ऑर्डस मागे 30 रूपये डिलिव्हरी + 9.80 रूपये हँडलिंग + 5 रूपये स्मॉल कार्ट शुल्क + 18% जीएसटी)
  • तर सर्व डिलिव्हरी ॲप्स जसे की झेप्टोमध्ये 84 रूपये किमतीच्या ऑर्डसमागे 115.50 रूपये ग्राहकांकडून चार्जेस घेते, तर ब्लिंकिटे त्याच किमतीच्या वस्तू डिलिव्हरी चार्जेस लावून 143 रूपये घेते. तसेच
  • इन्स्टामार्ट 154 रूपयांत सर्व शुल्क आकारून ग्राहकांपर्यंत ती वस्तू देते.

99 रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डरवर पूर्णपणे मोफत

झेप्टो या डिलिव्हरी ॲपने 99 रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ऑर्डरसाठी सर्व शुल्क माफ केले आहे, म्हणजेच ग्राहक यामध्ये फक्त खरेदी केलेल्या वस्तुचे पैसे देईल. त्यातच ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट हे ग्राहकांची ऑर्डरची किंमत 199 रूपये होत नाही तोपर्यंत शुल्क आकारत राहतात.

उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की झेप्टोचे शून्य-शुल्क मॉडेल हे बाजारपेठेतील शेअर वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. मात्र दीर्घकाळासाठी असे मोफत मॉडेल बाजारात राखणे खूप आव्हानात्मक असू शकते कारण त्याचा या ॲप्सच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. पण सध्या ग्राहकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. त्यामुळे झेप्टो ॲप वरून कमी किमतीत, मोफत डिलिव्हरी आणि त्रासमुक्त तुमच्या आवडत्या वस्तू ऑर्डरिंगचा आनंद घेऊ शकतात.

नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.