1 कोटीचं घर खरेदी करण्यासाठी किती पगार असायला हवा? संपूर्ण गणित एका क्लिकवर

घर खरेदी हे सर्वांचे स्वप्न असते. मात्र तुम्ही जे घर खरेदी करणार आहात, त्यासाठी तुमचा पगार पुरेसा आहे का? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

1 कोटीचं घर खरेदी करण्यासाठी किती पगार असायला हवा? संपूर्ण गणित एका क्लिकवर
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:59 PM

प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं असं वाटतं. अत्यंत प्रतिष्ठीत एरियात आणि प्रशस्त घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण खिशात तेवढा पैसा नसतो, त्यामुळे घर खरेदी करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. एक तर पगार कमी किंवा पगार अधिक असला तरी घर खरेदी करण्याचं गणित जुळवता येत नसल्याने घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. पण तुम्ही एक कोटीचं घर खरेदी करू शकता. त्यासाठी किती पगार असला पाहिजे याचं गणित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गणित पाहून तुम्हालाही अलिशान घर खरेदी करण्याचा मोह आवरता येणार नाही.

बबनचे घर खरेदीचे स्वप्न

बबनने एक आलिशान अपार्टमेंट पाहिले. त्याची किंमत 1 कोटी रुपये होती. त्याने ठरवले की तो ते घर खरेदी करेल. पण जेव्हा तो बँकेत गेला, तेव्हा त्याला हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एक मजबूत प्लान असायला हवा हे समजलं.

होम लोनचे गणित

समजा तुमचंही स्वप्न बबनसारखंच आहे असं समजू. घर खरेदी करण्यासाठी बँक सामान्यतः प्रॉपर्टीच्या किमतीचा 80% कर्ज देते. याचा अर्थ, तुम्हाला 80 लाख रुपये कर्ज मिळू शकते, आणि 20 लाख डाउन पेमेंट तुमच्या बचतीतून करावे लागेल. जर तुम्ही 80 लाखाचे कर्ज घेतले आणि ते 30 वर्षे म्हणजेच 360 महिन्यांमध्ये परतफेड करायचे असेल, तर साधारणतः 8.5% वार्षिक व्याज दरावर तुमचा मासिक EMI सुमारे 61,500 होईल.

पगार किती असावा लागेल?

बँकेचा नियम आहे की तुमचा EMI तुमच्या मासिक पगाराच्या 40%-50% पेक्षा जास्त नसावा. जर 61,500 रुपये तुमचा EMI असेल, तर तो तुमच्या पगाराच्या 40% समजला जाईल. याचा अर्थ, तुमचा मासिक पगार किमान 1,53,750 असावा लागेल. या पगाराची वार्षिक सरासरी काढली तर तुमचा वार्षिक पगार 18.45 लाख असावा लागेल.

आणखी खर्च कसे असतील?

ही गणना फक्त कर्ज आणि EMI पर्यंतच मर्यादित आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, देखभाल, आणि इतर खर्च देखील विचारात घेतले पाहिजेत. तुमची आर्थिक स्थिती समजून घेतल्यावरच तुम्ही घर खरेदी करण्याचा योग्य निर्णय घेऊ शकता. तर, तुम्ही हे गणित समजून घेतल्यास तुमचं स्वप्न असलेले घर लवकरच तुम्ही सत्यात उतरवू शकता.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.