Aadhaar Card Update: आधारमध्ये एकदाच बदलता येणार जन्मतारीख! चुकूनही करु नका ‘ही’ चूक

आधारमधील (Aadhaar Card) जन्मतारीख आता एकदाच बदलता येणार आहे. यापूर्वी दोनदा जन्मतारखेत दोनदा बदल करता येत होता. पण यावर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मर्यादा आणली आहे. आता एकदाच आधारमधील जन्मतारखेत एकदाच बदल करता येईल

Aadhaar Card Update: आधारमध्ये एकदाच बदलता येणार जन्मतारीख! चुकूनही करु नका 'ही' चूक
Aadhaar Card
Image Credit source: Tv9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Apr 18, 2022 | 11:33 AM

शाळांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. लहान मुलांच्या आधार कार्डसाठी ( Aadhar Card) मोठ्या संख्येने पालक पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्राकडे धाव घेत आहेत. पण नाव आणि जन्मतारखेचा तपशील भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आधारमधील जन्मतारीख (Date of Birth) आता एकदाच बदलता येणार आहे. यापूर्वी दोनदा जन्मतारखेत दोनदा बदल करता येत होता. पण यावर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मर्यादा आणली आहे. आता एकदाच आधारमधील जन्मतारखेत एकदाच बदल करता येईल. 2019 मध्ये प्राधिकरणाने नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलाची मर्यादा निश्चित केली होती. याअंतर्गत आधार कार्डधारक केवळ दोनदाच आपले नाव आधारमध्ये अद्ययावत करू शकतो. या बदलासाठी कोणत्याही आधार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. हे बदल ऑनलाइन पद्धतीने करता येतील. जन्मतारीखही एकदाच बदलता येईल.

जन्म तारीख नोंदणी करताना चूक झाल्यास जन्मतारखेत बदल करता येतो. याद्वारे जन्मतारखेत कमी-जास्त करता येईल. तारीख तीन वर्षे कमी किंवा अधिक करता येते. त्याचबरोबर ऑनलाईन मोडमध्ये लिंग निवडीबाबत एकदाच बदलता येतं. पण, लिंग तपशीलात बदल करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.

नोंदणी करताना घ्या काळजी

प्रयागराजचे मुख्य पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर राजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, नियम बदलल्यामुळे लोकांनी अधिक सजगपणे आधार बदलण्याची गरज आहे. त्याचबरोबर ऑपरेटरने चूक केली असेल तरच जन्मतारीख बदलता येते. जन्मतारीख पुन्हा बदलण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे द्यावी लागतात.

आधारमध्ये अशा प्रकारे जन्मतारीख करा अपडेट

1. सर्वात आधी https://ssup.uidai.gov.in/ssup/ जावे लागले .

2. आता ‘प्रोसीड टू अपडेट आधार’वर क्लिक करा. यामुळे एक नवीन पेज उघडेल.

3. आता 12 अंकी आधार क्रमांकासह लॉग इन करा.

4. यानंतर कॅप्चा कोड भरा आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा

5. आता ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर पोहोचेल. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपीसाठी प्रक्रिया करून सबमिटवर क्लिक करा.

6. आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील. दस्तऐवज पुराव्यासह पत्त्यासह डेमोग्राफिक तपशील अद्ययावत करणे आणि पत्ता प्रमाणीकरण पत्राद्वारे पत्ता अद्ययावत करणे

7. नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता या पुराव्यांसह कोणताही दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’वर क्लिक करावे लागेल

8. आता अपडेट करायचे तपशील निवडा. सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुमच्या नंबरवर एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल

9. ओटीपी व्हेरिफाय करून ‘सेव्ह चेंज’वर क्लिक करा.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें