घर वा जमीन खरेदीसाठी PF मधून काढू शकता अ‍ॅडव्हान्स पैसे, अशी प्रक्रिया पूर्ण करा

| Updated on: Apr 22, 2023 | 9:24 PM

नोकरदारांना आपल्या प्रोव्हीडंट फंडातून बिल्डींग अ‍ॅडव्हान्स काढता येते. काय आहे त्याची प्रक्रिया पाहा...

घर वा जमीन खरेदीसाठी PF मधून काढू शकता अ‍ॅडव्हान्स पैसे, अशी प्रक्रिया पूर्ण करा
PF-Withdrawal
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : नोकरदार मंडळीसाठी त्यांचा प्रोव्हीडंट फंड ( PF ) बचतीचा फार मोठा मार्ग आहे. नोकरी करणाऱ्या मंडळीचा बेसिक सॅलरीचा एक भाग दर महिन्याला पीएफ फंडात जमा होत असतो. सरकार जमा रकमेवर दरवर्षी व्याज देत असते. सध्या पीएफ साठी सरकारने 8.15 टक्के व्याज निश्चित केले आहे. याआधी हे व्याज 8.1 टक्के होते. पीएफ खातेधारक आपल्या EPFO खात्यातून आस्कमिक गरजांसाठी उदा. घर किंवा जमिन खरेदी करण्यासाठी अ‍ॅडव्हास पैसे काढू शकतात.

आपल्या EPFO खात्यातून घर, प्लॉट किंवा जमीन खरेदी करण्यासाठी अ‍ॅडव्हास पैसे काढता येतात. हे हाऊस बिल्डींग अ‍ॅडव्हान्सची तरतूद पूर्ण करण्यासाठी आपले पीएफ खाते पाच वर्षे पूर्ण झालेले हवे आहे. तसेच खात्यात व्याज सहीत हिश्यात कमीत एक हजार रूपये असायला हवेत. अशाप्रकारे ते अ‍ॅडव्हास पैसे काढू शकतात. प्लॉट खरेदीसाठी डीए सह 24 महिन्यांचे वेतन किंवा ईपीएफ खात्यात व्याजासह जमा झालेली एकूण रक्कम आणि प्लॉटची वास्तविक किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल ती मिळू शकते.

अशा प्रकारे क्लेम करावा

आपल्याला आधी उमंग अ‍ॅप umang app वर किंवा EPFO च्या वेबसाईटवर फॉर्म क्रमांक 31 भरावा लागेल. आधी UAN नंबर टाकावा लागेल. त्यानंतर रजिस्टर मोबाईलवर OTP येईल. तो भरावा. फॉर्म क्रमांक 31 निवडून अ‍ॅडव्हान्सची कारण लिहावे, नंतर काढायच्या रक्कमेचा आकडा भरावा, त्यानंतर आपल्या बॅंक खात्याचा चेकची प्रत अपलोड करावी. अशा प्रकारे क्लेम करावा. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे जमा होतील.

असा तपासा बॅलन्स

नोकरदार कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. एम्पॉयरच्यावतीने कर्मचाऱ्याच्या पगारातून कापलेल्या 8.33 टक्के रक्कम ( ईपीएस कर्मचारी पेन्शन योजना ) आणि 3.67 टक्के रक्कम ईपीएफ मध्ये पोहचते. आपण घरबसल्या आपल्या खात्याचे बॅलेन्स तपासू शकतो.उमंग एप किंवा वेबसाईटवर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एका ‘एसएमएस’वर हे कळते. देशभरात सहा कोटी EPFO खातेधारक आहेत. EPFO खात्यातील जमा रक्कम सरकार विविध योजनात गुंतवते. त्यातून होणारी कमाई व्याजाच्या रूपात खातेधारकांना दिली जाते.