विमानाचं इंधन स्वस्त होण्याची शक्यता, ‘या’ राज्याकडून मोठी करकपात

ATF | हरियाणामधील गुरुग्राममध्ये हेली-हब उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. हरयाणा सरकारने एअर टर्बाइन इंधनावरील व्हॅट दर 20 टक्क्यांवरून 1 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानाच्या इंधनाच्या दरात मोठी कपात होईल.

विमानाचं इंधन स्वस्त होण्याची शक्यता, 'या' राज्याकडून मोठी करकपात
विमानाचं इंधन स्वस्त

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलसोबत विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता हरियाणा सरकारने विमानाच्या इंधनावरील करात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याठिकाणी विमानाचे इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

हरियाणामधील गुरुग्राममध्ये हेली-हब उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. हरयाणा सरकारने एअर टर्बाइन इंधनावरील व्हॅट दर 20 टक्क्यांवरून 1 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमान इंधनाच्या दरात मोठी कपात होईल.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर ही माहिती दिली. बैठकीत हरियाणा राज्याच्या विविध महत्त्वाच्या नागरी उड्डाण प्रकल्पांबाबत चर्चा झाली. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. हरियाणातील हेली हब 2023 पर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कर्नाल आणि अंबाला हवाई पट्ट्या देखील विकसित केल्या जातील. गुरुग्राममध्ये हेली-हबच्या स्थापनेमुळे, इंटरसिटी आणि इंट्रासिटी हेलिकॉप्टरच्या सुविधा सुरु होतील.

जेट फ्युएलच्या दरात मोठी वाढ

1 ऑक्टोबरपासून व्हिएशन टर्बाईन फ्यूएलच्या (ATF) दरात मोठी वाढ झाली होती. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी ATF चे दर प्रति किलोलीटर 3972.94 रुपयांनी वाढवले होते. त्यामुळे आता जेट फ्युएलचा दर प्रति किलोलीटर 72,582.16 रुपये इतका झाला आहे. परिणामी हवाई कंपन्यांकडून आगामी काळात तिकीटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरानुसार जेट फ्युएलचे दर निश्चित होतात. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दिल्लीत ATF ची किंमत वाढून 72,582.16 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये ते 76,590.86 रुपये, मुंबईत 70,880.33 रुपये आणि चेन्नईमध्ये जेट फ्युएलसाठी प्रति किलोलीटर 74,562.59 रुपये मोजावे लागत आहेत.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI