Fixed Deposit : नावाजलेल्या बॅंकांपेक्षा एअरटेल पेमेंट्स बँक देते सर्वाधिक व्याज

एअरटेल पेमेंट बँकेत मुदत ठेव उघडणाऱ्या ग्राहकांना 6.5 ते 7 टक्के व्याज मिळणार आहे. एवढेच नव्हे तर एअरटेल पेमेंट्स बँकेत एफडी उघडणाऱ्या ग्राहकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढल्याबद्दल कोणताही दंड भरावा लागणार नाही.

Fixed Deposit : नावाजलेल्या बॅंकांपेक्षा एअरटेल पेमेंट्स बँक देते सर्वाधिक व्याज
Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 2:14 PM

एअरटेल पेमेंट्स(Airtel Payments Bank) बँकेने मंगळवार, 26 एप्रिलपासून ग्राहकांसाठी मुदत ठेव (Fixed Deposit) सुविधा सुरू केली आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेने ग्राहकांसाठी एफडी (FD) सेवा सुरू करण्यासाठी इंडसइंड बँकेसोबत (Indusind Bank) भागीदारी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एअरटेल पेमेंट बँकेत मुदत ठेव खाते उघडणाऱ्या ग्राहकांना 6.5 ते 7 टक्के व्याज मिळेल. एवढेच नव्हे तर एअरटेल पेमेंट्स बँकेत एफडी उघडणाऱ्या ग्राहकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी (Maturity) पैसे काढल्याबद्दल कोणताही दंड भरावा लागणार नाही. अर्थात एअरटेल पेमेंट्स बँकेची ही ऑफर त्यांच्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. एफडी (FD) सेवा सुरू झाल्यानंतर एअरटेल पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहकांना 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांसाठी मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवणूक करु शकता. इतकंच नाही तर ग्राहक एकावेळी एकापेक्षा जास्त मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता.

500 रुपयांपासून 1.90 लाख रुपयांपर्यंत एफडी बनवता येणार

एअरटेल पेमेंट्स बँकेत एअरटेल थँक्स अॅपच्या (Airtel Thank App) माध्यमातून 500 ते 1 लाख 90 हजार रुपयांची एफडी करता येईल, त्यावर 6.5 टक्के व्याज मिळेल, असे इंडसइंड बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना सर्व एफडीवर 0.5 टक्के अधिक म्हणजे टक्के व्याज दिले जाणार आहे.

एअरटेलच्या ग्राहकांना 1 ते 3 वर्षांसाठी काढता येईल एफडी

एखाद्या ग्राहकाला मॅच्युरिटीपूर्वी एफडी तोडायची असेल तर त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही आणि गुंतवलेले सर्व पैसे काही मिनिटांत तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर होतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. इंडसइंड बँकेने सांगितले की, एअरटेल पेमेंट्स बँक ग्राहकांना 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांसाठी मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवणूक करु शकता. इतकंच नाही तर ग्राहक एकावेळी एकापेक्षा जास्त मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता.

एअरटेल पेमेंट्स बँक ही एअरटेल कम्युनिकेशन्सची उप कंपनी

एअरटेल पेमेंट बँक ही एअरटेल कम्युनिकेशन्स या देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल कम्युनिकेशन्सने 2017 मध्ये एअरटेल पेमेंट्स बँक सुरू केली. विकिपीडियानुसार, एअरटेल पेमेंट्स बँकेत एअरटेलची 80.01 टक्के आणि कोट महिंद्रा बँकेची 9.99 टक्के भागीदारी आहे.

इतर बातम्या :

Navneet Rana : खासदार राणांची पुन्हा होणार पोलखोल; सांताक्रूझ पोलिसांचेही आता लाव रे तो व्हिडीओ…!

Corona : कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; कोरोनाच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान म्हणाले लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता

Aurangabad | राज ठाकरे यांच्या सभेची तयारी जोमात, मनसेचे लाखो ध्वज सज्ज, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आज औरंगाबादेत!

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.