Akshaya Tritiya 2022: चुकवू नका अशा संधी, सोन्यासह डायमंडच्या खरेदीवर सोन्याचे दोन शिक्के मोफत, या आहेत ऑफर्स

तनिष्क, सोने आणि हि-यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20 टक्के सूट देत आहे. साध्या डिझाईनवर प्रति ग्रॅम 200 रुपयांची सूट दिली आहे. देशाच्या पूर्वेतील राज्यांसाठी ही खास ऑफर आहे.

Akshaya Tritiya 2022:  चुकवू नका अशा संधी, सोन्यासह डायमंडच्या खरेदीवर  सोन्याचे दोन शिक्के मोफत, या आहेत ऑफर्स
सोने-चांदीच्या दरात घसरण Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 9:38 AM

साडेतीन मुहुर्तांपेकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या (Akshya Tritiya) मुहुर्तावर सोने खरेदीची (Gold Buy) सोन्यासारखी संधी सर्वत्र उपलध झाली आहे. सराफा बाजारात तर सध्या तोबा गर्दी उसळली आहे. देशात दसरा, दिवाळी आणि अक्षय तृतीयेला सोने खरेदीला शुभ मानण्यात येते. भारतीय संस्कृतीत या सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सोन्याची केलेली खरेदी ही धन वृद्धी करणारी मानण्यात येते. त्यामुळे वर्षातून निदान या सणाच्या काळात सोन्यात थोडी का असेना वाढ करण्याचा प्रयत्न भारतीय करतात. अनेक ज्वेलर्सनी सोन्यावर ऑफर्सचा भडीमार सुरु केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या आणि सराफांनी ऑफर्स दिल्या आहेत. सोने, चांदी आणि हिरे जडलेल्या दागिन्यांवर चांगली ऑफर (Gold and Jewellery offers) मिळत आहे. तनिष्क, टीबीझेड, कल्याण ज्वेलर्स, मालाबार गोल्ड आणि अन्य प्रमुख ज्वेलर्स या दिवसांसाठी खास ऑफर देत आहेत.

  1. Tanishq तनिष्क, सोने आणि हि-यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20 टक्के सूट देत आहे. साध्या डिझाईनवर प्रति ग्रॅम 200 रुपयांची सूट दिली आहे. देशाच्या पूर्वेतील राज्यांसाठी ही खास ऑफर आहे. ही ऑफर 24 एप्रिल ते 4 मे या दरम्यान मिळत आहे. ग्राहकांना या सवलतीची सविस्तर माहिती तनिष्कच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  2. Caratlane अक्षय तृतीयाच्या सणाला Caratlane ने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने त्यांच्या सर्व डिझाईनवर हि-यांच्या किंमतीत सरळसरळ 20 टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. ही ऑफर 22 एप्रिल ते 3 मे पर्यंत लागू आहे.
  3. Senco Gold Senco Gold ने सोन्याच्या दागिन्यांवर प्रति ग्रॅम 224 रुपयांची सवलत आणि घडणावळीवर सरळ सरळ 50 टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. डायमंड ज्वेलरी आणि चांदीच्या शिक्के तयार करण्यावर 100 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
  4. Malabar Gold मालाबार गोल्डने अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर बंपर ऑफर दिली आहे. कंपनीने एक जबरदस्त ऑनलाईन ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार, 25 हजार रुपयांच्या सोन्याच्या खरेदीवर मोफत सोन्याचा शिक्का मिळत आहे. कंपनीने 25 हजार रुपयांच्या हिरे आणि दागिणे खरेदीवर दोन सोन्याचे शिक्के देत आहे. क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणा-या ग्राहकांना अतिरिक्त 5 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. PC Jewellers या कंपनीने चांदीच्या दागिन्यांवर सरळसरळ 40 टक्क्यांची आणि डायमंड दागिन्यांवर 30 टक्के सवलत जाहीर केली आहे.
  7. Joyalukkas ही कंपनी 50 हजार रुपयांचे हिरे आणि दागिन्यांच्या खरेदीवर 1 ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत देत आहे.
  8. TBZ या ज्वेलर्सने सोने आणि हि-याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50 टक्क्यांची सूट दिली आहे. तसेच सोने विक्रीवर 100 टक्के मुल्य निर्धारणाची सवलत जाहीर केली आहे. 3 मे पर्यंत ही ऑफर आहे.
  9. Kalyan Jewellers या ज्वेलर्सने 25 हजार रुपयांवरील सोन्याच्या खरेदीवर मोफत सोन्याचे नाणे ऑफर केले आहे. तसेच सोन्याच्या दागिन्यांवर 60 टक्के सवलत तर डायमंड दागिन्याच्या घडणावळीवर एकही रुपया न घेण्याचे जाहिर केले आहे. प्लॅटिनियम दागिन्यांच्या घडणावळीवर 40 टक्के सवलत जाहीर केली आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.