AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Aadhaar Card’ ची चिंता सोडा, आता घरबसल्या मिळणार सर्व सेवा; आधार कार्ड अपडेटसह चुका ही होणार दुरुस्त, UIDAI आणि पोस्ट खात्याची संयुक्त मोहिम लवकरच

Aadhaar Card शी संबंधित सर्व कामे आता घरबसल्या करता येणार आहे. त्यासाठी आधार सेवा केंद्र वा ई-सेवा केंद्रांवर जाण्याची गरज नसेल. टपाल खात्याने या सेवा घरपोच देण्याची जबाबदारी खाद्यांवर घेतली आहे.

'Aadhaar Card' ची चिंता सोडा, आता घरबसल्या मिळणार सर्व सेवा; आधार कार्ड अपडेटसह चुका ही होणार दुरुस्त, UIDAI आणि पोस्ट खात्याची संयुक्त मोहिम लवकरच
टपाल खात्याचा युआयडीएआयला 'आधार'Image Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 1:33 PM
Share

Aadhaar Card अपडेट करण्यासाठी वा नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी आता तुम्हाला ई-सेवा केंद्र (e-Seva Kendra) वा आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज नाही. आधार कार्डशी संबंधित सर्व कामे नागरिकांना आता घरबसल्या पूर्ण करता येतील. टपाल खात्याने या सेवा घरपोच (At Home) देण्याची जबाबदारी खाद्यांवर घेतली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) याविषयीचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी टपाल खात्याची मदत घेण्यात येत आहे. टपाल खात्याच्या (Post Office) सहकार्याने ही सेवा देशभरात पोहचवली जाणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना होणारा त्रास तर कमी होईलच, पण चुका होण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. देशातील 755 जिल्ह्यांमध्ये नव्याने आधार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी प्राधिकरणाने युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. या केंद्रांवर नागरिकांना नवीन आधार कार्ड तयार करता येईल. आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करता येईल. नावात बदल करता येईल. घरचा पत्ता अपडेट करता येईल. लवकरच ही सुविधा देशभरात सुरु होणार आहे.

1.5 लाख कर्मचा-यांना प्रशिक्षण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, UIDAI ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 48 हजार कर्मचा-यांना यासाठीचे प्रशिक्षण सुरु केले आहे. आधार कार्डशी संबंधित सेवा कशा द्यावात याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन सेवा देतील. UIDAI टपाल खात्याच्या एकूण 1.5 लाख कर्मचा-यांना दोन टप्प्यात आधार कार्ड सेवेचे प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेले अधिकारी थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवतील.

UIDAI देणार तांत्रिक सहकार्य

केवळ प्रशिक्षणच नाही तर UIDAI कर्मचा-यांना लॅपटॉप आणि अन्य आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि यंत्र प्रणाली पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांना कुठे ही जावून आधारशीसंबंधित कामे करता येतील. तसेच आधार कार्ड संबंधी चूका दुरुस्त करता येतील. आधार कार्डमध्ये पत्ता, जन्मतारीख अपडेट करता येईल. मोबाईल क्रमांक लिंक करता येईल. यासोबतच लहान मुलांचे आधार कार्ड तयार करणे, वृद्धांचे आधार कार्ड तयार करणे या सुविधा ही देण्यात येणार आहे. ही सर्व कामे अत्यंत जलद आणि सहजतेने होण्यासाठी तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे.

755 जिल्ह्यांमध्ये सेवा पोहचणार

UIDAI देशभरातील 755 जिल्ह्यांत आधार सेवा केंद्र सुरु करणार आहे. याचे काम गतीने सुरु आहे. सध्या देशभरात 72 शहरात एकूण 88 आधार सेवा केंद्र नागरिकांना सेवा देत आहेत. याशिवाय सर्व सरकारी बँका, टपाल खाते, राज्य सरकार यांच्याकडून 35 हजारांहून अधिक आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....