Demonetized Notes : 500, 1000 रुपयांच्याच नाही तर या नोटेवर पण घालण्यात आलीये बंदी!

Demonetized Notes : भारतातील नोटबंदी ऐतिहासिक ठरली. देशात 500,1000 रुपयांच्याच नोटा बंद झाल्या नाही तर ही नोट पण कायमची बाद झाली आहे.

Demonetized Notes : 500, 1000 रुपयांच्याच नाही तर या नोटेवर पण घालण्यात आलीये बंदी!
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : देशात नोटबंदीचा निर्णय ऐतिहासिक ठरला. काळेधन परत आणण्यासाठी, दहशतवाद संपविण्यासाठी नोटबंदी केल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. पण त्यानंतर जी आकडेवारी समोर आली, त्यातून नोटबंदीतून काही महत्वाचे हाती लागले नसल्याचे समोर आले. केंद्र सरकारवर (Central Government) विरोधकांनी जबरदस्त पलटवार केला. विशेष म्हणजे नकली नोटांचे प्रमाण ही कमी झाले नाही. या नोटाबंदीत (Demonetisation in India) देशात 500,1000 रुपयांच्याच नोटा बंद झाल्या नाही तर ही नोट पण कायमची बाद झाली आहे.

8 साधला मुहूर्त नोटबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता अचानक सांगण्यात आला. त्यानंतर देशभरातील काही चलनी नोटा झटक्यात कागदाचे तुकडे झाल्या. केंद्र सरकारने त्याचे मूल्य काढून घेतले. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर गंडातर आले. सध्या देशात 10, 20, 50, 100, 200, 500, आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.

यापूर्वी झाली होती नोटबंदी पण अनेक जणांना वाटते 2016 साली पहिल्यांदाच नोटबंदी झाली. पण तसे नाही. देशात नोटबंदीची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी झालेल्या नोटबंदीत 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. दहा हजार, पाच हजारांच्या नोटा चलनात होत्या हे बऱ्याच जणांना माहितीच नाही.

हे सुद्धा वाचा

10,000 रुपयांची नोट दोनदा बाद भारतीय रिझर्व्ह बँकच्या संकेतस्थळानुसार, आरबीआयने पहिल्यांदा 1938 मध्ये 10,000 रुपयांची नोट छापली होती. भारतीय चलनात ही सर्वात मूल्य असलेली नोट होती. पण जानेवारी 1946 मध्ये ही नोट बंद करण्यात आली. 1954 मध्ये 10,000 रुपयांची नोट चलनात आली. पण 1978 मध्ये ही नोट पुन्हा बंद करण्यात आली.

या नोटा चलनातून बाद आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.

नकली नोटा दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या. 2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे. त्यासाठी तर त्या दडवून ठेवण्यात येत नाही ना, असा एक मतप्रवाह आहे.

Non Stop LIVE Update
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.