
ऑनलाइन शॉपिंग करायला आवडतं? आणि त्यातही Amazon तुमचा फेव्हरेट प्लॅटफॉर्म असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे! Amazon चा Summer Sale सुरू झाला आहे आणि यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड्स, गेमिंग कन्सोल अशा अनेक गॅजेट्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहेत. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखादं नवीन गॅजेट घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे!
1. Samsung Galaxy S24 Ultra : जर तुम्ही एका प्रीमियम आणि पॉवरफुल अँड्रॉइड फोनच्या शोधात असाल, तर S24 Ultra हा सध्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. याची मूळ किंमत ₹१,२९,९९९ आहे, पण या सेलमध्ये तो तब्बल ₹८४,९९९ मध्ये उपलब्ध आहे! यात मिळतो ६.८ इंचाचा अप्रतिम 120Hz AMOLED डिस्प्ले, लेटेस्ट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 200MP चा जबरदस्त कॅमेरा सेटअप आणि खास S Pen, ज्यामुळे तुम्ही नोट्स घेऊ शकता किंवा कॅमेरा कंट्रोल करू शकता. एवढ्या मोठ्या डिस्काउंटसह हा फ्लॅगशिप फोन घेणं म्हणजे मोठी बचत!
2. Samsung Galaxy Watch 6 Classic : तुमच्या स्मार्टफोनला एका स्टायलिश आणि फीचर-पॅक स्मार्टवॉचची जोड हवी आहे? तर Galaxy Watch 6 Classic तुमच्यासाठी आहे. याची मूळ किंमत ₹४२,३९९ असली तरी, सेलमध्ये ही घड्याळ फक्त ₹१७,३९९ मध्ये मिळत आहे! यातला क्लासिक लुक देणारा Rotating Bezel, AMOLED डिस्प्ले, ECG, बॉडी कंपोझिशन एनालिसिससारखे हेल्थ फीचर्स आणि Wear OS चा सपोर्ट या किंमतीत मिळणं म्हणजे ‘लय भारी’ डील!
3. Apple AirPods 4 : iPhone वापरणाऱ्यांसाठी AirPods म्हणजे जीव की प्राण! नुकतेच लाँच झालेले AirPods 4 उत्तम आवाज, चांगली बॅटरी लाईफ आणि नवीन फीचर्ससह येतात. यांची लाँच किंमत ₹१२,९०० होती, पण सेलमध्ये ते फक्त ₹११,४९९ मध्ये मिळत आहेत. Spatial Audio, Find My सपोर्ट आणि Instant Pairing यांसारख्या फीचर्समुळे ॲपलचं हे लेटेस्ट प्रोडक्ट इतक्या कमी किंमतीत घेण्याची ही चांगली संधी आहे.
4. MSI Claw : PC गेम्स खेळायला आवडतात पण ते कुठेही घेऊन जाता येत नाहीत? मग MSI Claw हा तुमच्यासाठी आहे! हा एक पॉवरफुल हँडहेल्ड गेमिंग कन्सोल आहे. याची मूळ किंमत ₹८६,९९० आहे, पण सेलमध्ये तो फक्त ₹६३,००० मध्ये मिळत आहे. यात Intel Core Ultra 7 प्रोसेसर, 16GB RAM, 512GB SSD आणि ७ इंचाची FHD टचस्क्रीन आहे. Xbox सारखे कंट्रोल्स आणि बिल्ट-इन फॅनमुळे गेमिंगचा अनुभव जबरदस्त मिळतो.
5. Sony PlayStation 5 Slim : गेमिंगच्या दुनियेतला राजा म्हणजे PlayStation! Sony PS5 Slim ची मूळ किंमत ₹४४,९९० आहे, पण सेलमध्ये तो ₹३८,२४० मध्ये उपलब्ध आहे. हा नेहमीच्या PS5 पेक्षा थोडा Compact आहे, पण परफॉर्मन्समध्ये कोणतीही तडजोड नाही. 4K गेमिंग, Ray Tracing आणि सुपर-फास्ट SSD मुळे हा आजही सर्वोत्तम कन्सोलपैकी एक आहे. गेमिंगच्या शौकिनांसाठी ही डील चुकवू नये अशीच आहे.
सेलमध्ये अजून बरंच काही!