1000 Rupees Note : या केवळ वावड्या की 1000 रुपयांची नोट येणार परत? RBI गव्हर्नरने केले स्पष्ट

1000 Rupees Note : गुलाबी नोटेनंतर भारतात आता 1000 रुपयांची नोट परत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, आरबीआयच्या गव्हर्नरने याविषयी काय दिली माहिती..

1000 Rupees Note : या केवळ वावड्या की 1000 रुपयांची नोट येणार परत? RBI गव्हर्नरने केले स्पष्ट
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 6:02 PM

नवी दिल्ली : क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलवल्या. त्यानंतर आता 23 मे पासून देशातील बँकांमध्ये या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या गुलाबी नोटा परत (2000 Rupee Note Exchange) करण्यासाठी केंद्रीय बँकेने 4 महिन्यांपर्यंत कालावधी दिला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना या नोटा परत करता येतील. एका दिवशी नागरिकाला 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलता येतील. एका दिवशी 20000 रुपये मूल्याच्या नोटा बदलता येतील. आता या गुलाबी नोटांची जागा 1000 रुपयांची नोट घेईल असा दावा करण्यात येत आहे. तसेच याविषयीच्या चर्चा ही रंगल्या आहेत. आरबीआयच्या गव्हर्नरने याविषयी अशी माहिती दिली आहे..

1000 रुपयांची नोट येणार की नाही ? येत्या चार महिन्यांत 2000 रुपयांच्या नोटांची हळूहळू घरवापसी होणार आहे. देशात आता अधिक मूल्याची नोट हवी म्हणून 1000 रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तर या चर्चांचा ऊत आला आहे. अनेक लोकांना केंद्र सरकार 2000 रुपयांची नोट बंद करुन 1000 रुपयांची नोट घेऊन येईल, असे वाटते. या चर्चा सुरु असतानाच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयी मोठा खुलासा केला आहे.

RBI गव्हर्नरचे म्हणणे काय भारतात 1000 रुपयांची नोट येणार असल्याच्या चर्चांवर RBI गव्हर्नर यांनी चर्चा दिली आहे. त्यानुसार, 1000 रुपयांची नोट आणण्याचा कोणताच प्रस्ताव नाही. या अफवा आहेत. बाजारात दुसऱ्या मूल्यांचं चलन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. चार महिन्यांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

आता 500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची देशात अजून 1000 रुपयांच्या नोटेचा काहीच फैसला झालेला नाही. 2000 रुपयांच्या नोटेची घरवापसी झाली आहे. त्यामुळे बाजारात 500 रुपयांची नोट अधिक मूल्यांची नोट ठरली आहे.

या नोटा चलनातून बाद आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, जानेवारी 1946 मध्ये पहिल्यांदा 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा जानेवरी 1978 मध्ये पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या.

महत्वपूर्ण बदल RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एका मर्यादेपर्यंत या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज अथवा ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही.

रोख आणि रोख न्या आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.