Bank strike : आजच पूर्ण करा आपली बँकेतील महत्त्वाची कामे; बँक कर्मचारी जाणार संपावर

आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचा इशारा देण्यात आला आहे. बँक कर्मचारी येत्या 27 जूनला संपावर जाणार असल्याने त्याचा परिणाम हा बँकेच्या कामांवर होऊ शकतो.

Bank strike : आजच पूर्ण करा आपली बँकेतील महत्त्वाची कामे; बँक कर्मचारी जाणार संपावर
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:07 AM

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपावर (Bank Strike) जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 27 जूनला बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना बँक कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे की, आमच्या काही मागण्या आहेत ज्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 27 जूनला कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारण्यात येणार आहे. पाच दिवसांचा आठवडा, राष्ट्रीय पेंशन योजना (Pension) रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करणे तसेच बँकांच्या खासगी करणाला विरोध अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे. या संपामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (AIBEA)तसेच नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स या प्रमुख संघटनांसह विविध बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे येत्या 27 जूनला बँकेच्या कामावर परिणाम होण्यााची शक्यता आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

याबाबत बोलताना एआयबीईएचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही 27 जूनला संपाचे आवाहन करत आहोत. बँक कर्मचाऱ्यांना पच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा. नव्याने सुरू झालेली राष्ट्रीय पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, अशा काही प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

जून महिन्यात बँकांना आठ दिवस सुटी

जून महिन्यात बँकांना एकूण आठ दिवस सुटी आहे. यामध्ये सहा साप्ताहिक सुट्यांचा समावेश आहे. तर दोन सुट्या या स्थानिक उत्सवांसाठी देण्यात आल्या आहेत. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्षभरात बँकांना किती सुट्या असणार याबाबत एक यादी वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध केली जाते. या यादिनुसार चालू महिन्यात बँकांना एकूण आठ सुट्या आहेत. यामध्ये 5, 12, 19 आणि 26 जून रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. तर 11 आणि 25 जून रोजी महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. दोन जून रोजी महाराणा प्रताप जयंती असल्याने शिमलामध्ये बँका बंद राहणार आहेत. मात्र दोन जून रोजी महाराष्ट्रात बँका सुरू राहणार असल्याने राज्यात एकूण सहाच दिवस बँका बंद राहणार आहेत. 15 जूनला राजा संक्रांतीनिमित्त मिझोरम, भुवनेश्वर आणि जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.