बचत खाते उघडण्यापूर्वी या सहा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या; छोट्या सुविधांसाठीही मोजावे लागतील पैसे

खाते उघडण्यापूर्वी व्याज दर तपासा. कारण यामुळे तुमचे उत्पन्न निश्चित होईल. तुम्ही जमा केलेली रक्कम व त्यावर मिळणारे व्याज अशा पद्धतीने एकरकमी रक्कम तुमच्या हातात मिळेल.

बचत खाते उघडण्यापूर्वी या सहा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या; छोट्या सुविधांसाठीही मोजावे लागतील पैसे
बचत खाते उघडण्यापूर्वी या सहा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 8:20 AM

नवी दिल्ली : बचत करण्यासाठी बचत खाते आवश्यक मानले जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने पैसे जमा करता आणि त्यावरील परताव्याच्या रूपात व्याज मिळत राहते. तुम्ही बचत खात्यामध्ये ईमर्जन्सी फंडदेखील जमा करू शकता. जेव्हा तुमच्याकडे पैशांची कमतरता असते, त्यावेळी तुम्हाला या ईमर्जन्सी फंडचा वापर करता येऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा की सर्व बचत खाती समान सुविधा देत नाहीत. सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्या बँकेत बचत खाते उघडत आहात, त्याचा तपशील पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतरच तुम्ही तुमचे बचत खाते उघडा. (Before opening a savings account, pay close attention to these six things)

व्याज दर

खाते उघडण्यापूर्वी व्याज दर तपासा. कारण यामुळे तुमचे उत्पन्न निश्चित होईल. तुम्ही जमा केलेली रक्कम व त्यावर मिळणारे व्याज अशा पद्धतीने एकरकमी रक्कम तुमच्या हातात मिळेल. असे मानले जाते की बचत खात्यात पैसे जाम होतात. कारण या खात्यावरील व्याज खूप कमी असते. परंतु जर तुम्ही खात्यातून पैसे काढले नाहीत तर व्याज वाढत जाते. जर तुमचे खाते तशा प्रकारचे असेल तरच व्याज जास्त असेल. व्याजाचा दरही बँकांवर अवलंबून असतो. त्यामुळे बँक आणि व्याजदर पाहूनच तुमचे बचत खाते उघडा.

मासिक शुल्क

अनेक बँका व बचत खाती अशाप्रकारची असतात, ज्या खात्यांमध्ये तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी मासिक शुल्कही भरावे लागते. व्याज दर कमी मिळतोय म्हणून मासिक शुल्क लागणार नाही, असा विचार मुळीच करू नका. जेथे तुम्हाला मासिक शुल्क भरावे लागत असेल तेथे तुम्ही तुमचे बचत खाते उघडणे टाळा. कारण त्याचा तुमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. अशी देखील काही खाती आहेत, जिथे किमान रक्कम ठेवावी लागते. तसे न केल्यास तुमच्या खात्यातून दंड वसूल केला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी मासिक शुल्क आणि वार्षिक शुल्काबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. जर तुम्हाला कमी व्याज मिळत असेल तर मग तुम्ही मासिक शुल्क का भरावे. हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर खाते उघडण्यापूर्वी नक्की या प्रश्नाचे उत्तर शोधा.

किमान ठेव रक्कम

काही बचत खाती अशी आहेत, जी खाती उघडताना त्यात किमान रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम कमी असू शकते. परंतु ती जमा करणे आवश्यक असते. बँका अशा प्रकारचा नियम बनवतात, जेणेकरून तुम्ही बचत खाते उघडत असाल तर त्यात तुम्ही नक्कीच काही बचत ठेवाल. जर तुम्हाला ही रक्कम डिपॉझिट करायची नसेल तर तुम्हाला असे खाते शोधावे लागेल, जिथे पैसे जमा करण्याचे बंधन नाही. ऑनलाइन बचत खात्यावर असा कोणताही नियम नाही. तुम्ही अशी खात्यांचा अंदाज घेऊ शकता.

ऑटोमॅटिक ट्रान्सफर

पैसे बचत करणे सोपे काम नाही. म्हणून असे काही उपाय करा की एक विशिष्ट रक्कम स्वयंचलित अर्थात ऑटोमॅटिक बचत खात्यात जमा होत राहील. यासह आपण दरमहा ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा करू शकाल. काही बँका चेकिंग खात्यातून बचत खात्यात स्वयंचलित हस्तांतरणाची सुविधा देतात. यामध्ये बँकेने कोणतेही शुल्क आकारले नाही, याची खात्री करून घ्या. जर दरमहा स्वयंचलित पैसे ट्रान्सफर होत असतील, तर शेवटी एक चांगली रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल व विशिष्ट वेळी ती रक्कम तुम्हाला फार उपयुक्त ठरेल.

मोबाईल डिपॉझिटची सुविधा

मोबाईल अ‍ॅप किंवा वॉलेटद्वारे तुमच्या बचत खात्यात पैसे जमा करता येतात का? जर ही सुविधा उपलब्ध असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण तुमचा बँकांमध्ये किंवा एटीएमच्या डिपॉझिट मशीन सेंटरमध्ये फेऱ्या मारण्याचा त्रास वाचेल. परदेशात चेकच्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅपद्वारे खात्यात पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त बँकेच्या मोबाईल अ‍ॅपवरून चेक स्कॅन करायचा आहे व त्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. ही सुविधा आता खूप कमी प्रमाणात उपलब्ध असली तरी येत्या काळात तिचा प्रसार वाढणार आहे.

पैसे सहज काढता येणे

तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करता, पण तुम्ही ते सहज काढू शकत नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत पैसे काढण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे अशा बचत खात्याला काहीच अर्थ नाही. ज्या बँकेत तुम्ही बचत खाते उघडत आहात, तिथे पैसे काढण्याची सुविधा कशी आहे हेही आधी जाणून घ्या. एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, हेही जाणून घेतले पाहिजे. एटीएम कार्डद्वारे तुम्ही सहज पैसे काढू शकता. (Before opening a savings account, pay close attention to these six things)

इतर बातम्या

उद्धव ठाकरे-टास्क फोर्सची बैठक संपली; मंदिरं, मॉल्सवर निर्णय नाही, याही वर्षी सणांचे स्वरुप साधेच ?

भाजपनं तिकीट नाकारलं, भाजपच्याच मातब्बर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत विधानसभेत; आमदार गीता जैन यांचा राजकीय प्रवास

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.