AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे-टास्क फोर्सची बैठक संपली; मंदिरं, मॉल्सवर निर्णय नाही, याही वर्षी सणांचे स्वरुप साधेच ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबतची बैठक संपली आहे. या बैठकीत मंदिरं, मॉल तसेच रेस्टॉरंट यांना लागू असलेल्या निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

उद्धव ठाकरे-टास्क फोर्सची बैठक संपली; मंदिरं, मॉल्सवर निर्णय नाही, याही वर्षी सणांचे स्वरुप साधेच ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 11:37 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची टास्क फोर्ससोबतची बैठक संपली आहे. या बैठकीत मंदिरं, मॉल तसेच रेस्टॉरंट यांना लागू असलेल्या निर्बंधांच्या शिथिलीकरणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. तसेच मागिल वर्षीप्रमाणेच याही वर्षी सणांचे स्वरुप साधे असेल असे या बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती आहे.  याव्यतिरिक्त कोरोनाची तिसरी लाट, ऑक्सिजनची उपल्बधता तसेच लसीकरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. (meeting of Uddhav Thackeray with task force has ended no decision on Temples Restaurants and Mall)

सूचनांच्या अनुषंगाने टास्क फोर्स नियमावली तयार करणार

टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची यावरदेखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजच्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने टास्क फोर्स नियमावली तयार करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर उदवाडिया,अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, यांची उपस्थिती होती

मंदिरं, मॉल्स यावर कोणताही निर्णय नाही

येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकमधून सामान्यांना प्रवास करता येणार आहे. प्रवास करण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील मंदिरं तसेच रेस्टॉरंट आणि मॉल सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, अशी चर्चा आहे. येत्या काही दिवसांमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्समध्ये झालेल्या बैठकीत या बाबींवर कोणताही निर्णय झालेला नाही. याव्यतिरिक्त हॉटेल्स आणि दुकानांची वेळ वाढवून देता येईल का यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

इतर बातम्या :

शिवसेनेचा पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही, माणिकरावांची वडेट्टीवारांकडे तक्रार; आघाडीत धुसफूस?

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

BJP Meeting : राजधानी दिल्लीत भाजप नेत्यांची खलबतं सुरु, संघटनात्मक बदल की राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड?

(meeting of Uddhav Thackeray with task force has ended no decision on Temples Restaurants and Mall)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.