AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचा पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही, माणिकरावांची वडेट्टीवारांकडे तक्रार; आघाडीत धुसफूस?

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याने आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. (manikrao thakre complaint against Shiv Sena Leader Sandipan Bhumare to vijay wadettiwar)

शिवसेनेचा पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही, माणिकरावांची वडेट्टीवारांकडे तक्रार; आघाडीत धुसफूस?
manikrao thakre
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 7:48 PM
Share

यवतमाळ: शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याने आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार ठाकरे यांनी वडेट्टीवारांकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत शिवसेनेची राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेसची शिवसेनेविरोधात नाराजी असल्याचं उघड झालं आहे. (manikrao thakre complaint against Shiv Sena Leader Sandipan Bhumare to vijay wadettiwar)

यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना काँग्रेसला सापत्न वागणूक देत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे. काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे. तरीही या मतदारसंघात शिवसेनेचा धुडगूस सुरू आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान दिलं जात नाही. तसेच शिवसेनेचे पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाहीत. त्यामुळेच माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे जिल्ह्याचे संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे शिवसेनेच्या पालकमंत्री आणि आमदाराची तक्रार केली आहे. कांग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत माणिकराव ठाकरे बोलत होते.

धुसफूस नाही

शिवसेना जिल्ह्यातील सर्व समित्यांवर वर्चस्व ठेवताना दिसत आहे. त्याची जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यानेच थेट मंत्र्याकडे तक्रार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आघाडीत धुसफूस असल्याचं वृत्त वडेट्टीवार यांनी फेटाळलं आहे. आघाडीत धुसफूस नाही. दोन भाऊ असले तरी भांडणं होत असतात. इथं तीन पक्षाचं सरकार आहे. मागील सरकारमध्ये शिवेसना आणि भाजपमधील भांडण आपण रोज पाहत होतो, असं वडेट्टीवार म्हणाले.

फॉर्म्युल्या प्रमाणे काम व्हावं

प्रत्येकजण आपला हक्क मागत असतो. म्हणूनच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे समितीवरील नियुक्त्या करण्यात येतील. ज्या पक्षाचा पालकमंत्री त्यांना 60 टक्के तर इतरांना प्रत्येकी 40 टक्के असा फॉर्म्युला ठरलेला आहे. तसेच मतदारसंघ निहाय ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना 60 टक्के आणि इतरांना 20-20 टक्के पदे असा फॉर्म्युला ठरलेला आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम व्हावं, असं माणिकराव ठाकरेंनी सांगितलं. याचा अर्थ आघाडीत धुसफूस आहे असा होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

जिल्ह्यात कमबॅक करणार

यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा गड होता, हा गड परत मिळवण्यासाठी आता काँग्रेसने कंबर कसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितले. ग्रामीण भागापर्यंत आढावा बैठक. मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकही आमदार नसलेली काँग्रेस आगामी दिवसात काय चमत्कार घडवेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (manikrao thakre complaint against Shiv Sena Leader Sandipan Bhumare to vijay wadettiwar)

संबंधित बातम्या:

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार? जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे सहकार विभागाचे आदेश

VIDEO : नाशिकमध्ये महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य, राष्ट्रवादीचंही काँग्रेसच्या पावलावर पाऊल!

(manikrao thakre complaint against Shiv Sena Leader Sandipan Bhumare to vijay wadettiwar)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.