AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Multibagger Stock : ‘या’ बँकेच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल, दर चार वर्षाला पैसे डबल

देशावर दोन वर्ष कोरोनाचे संकट होते, कोरोनाचा मोठा फटका हा शेअर मार्केटला बसला. शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर्स कोसळले. मात्र अशा काही कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअर्सने या काळात देखील गुंतवणूकदारांची निराशा केली नाही.

Best Multibagger Stock : 'या' बँकेच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल, दर चार वर्षाला पैसे डबल
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: May 11, 2022 | 8:09 AM
Share

गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट (Covid-19) होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प होते. उद्योगधंदे ठप्प असल्याने याचा मोठा फटका हा कंपन्यांना बसल्याचे पहायला मिळाले. कंपन्यांना जसा फटका बसला तसाच हा फटका बँकांना देखील (Banking Crisis) बसला कोरोना काळात बँकांची उलाढाल मंदावल्याचे पहायला मिळाले. या सर्वांचा परिणाम हा शेअर मार्केटवर झाला. या काळात शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव (Share Market Sell Off) निर्माण झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले. मात्र यामध्ये काही शेअर्स असे देखील होते, ज्यांनी एवढ्या कठिण परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांना निराश केले नाही. या शेअर्समुळे गुंतवणूकदारांना लाखो रुपयांची कमाई झाली. आज आपण अशाच एका शेअर्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या शेअर्सने आतापर्यंत प्रत्येक चार वर्षाला गुंतवणूकदारांना दाम दुप्पट परतावा दिला आहे.

दर चार वर्षाला गुंतवणूक डबल

हा शेअर आहे भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेचा. या शेअरचा भाव 2009 नंतर प्रत्येक चार वर्षाला डबल होत आला आहे. एप्रिल 2009 मध्ये या शेअरची किंमत 65 रुपये इतकी होती. त्यानंतर चार वर्षांनी ऑगस्ट 2013 मध्ये या शेअर्सची किंमत दुपट्ट म्हणजे प्रति शेअर्स 150 रुपयांच्या जवळपास पोहोचली. त्यानंतर पुढील चार वर्षात म्हणजेच जून 2017 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची किंमत प्रति शेअर 305 रुपये झाली म्हणजेच डबल झाली. 2021 च्या सप्टेंबर तिमाहीमध्ये या शेअर्सच्या दरामध्ये तेजी आल्याचे पहायला मिळाले शेअर्सचे दर 720 रुपयांवर पोहोचले. वरील आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येते की, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये दर चार वर्षाला डबल वाढ झाली आहे.

सहावी सर्वात मोठी कंपनी

सध्या स्थितीमध्ये आयसीआयसीआय बँकेची मार्केट कॅप 4.95 लाख कोटी रुपये आहे. ही भारतीय शेअरबाजारातील सर्वात मोठी सहाव्या क्रमांकाची लिस्टेड कंपनी आहे. आयसीआयसीआय बँकेच्या पुढे रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, इंफोन्सिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचा नंबर लागतो. या शेअर्सने परताव्यामध्ये सातत्य राखल्याने येणाऱ्या काळात देखील परतावा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात देखील चांगला परतावा मिळू शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी
क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू; स्थानिकांची सरकारकडे 'ही' मागणी.