योगी आदित्यनाथ सरकारचे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, ई-पेंशन पोर्टलची सुरुवात; पेंशनसाठी ऑफीसचे खेटे टळणार

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने कामगार दिनाच्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. ई-पेंशन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. या पोर्टलच्या मदतीने पेंशन संबंधित सर्व कामे ऑनलाईन होणार आहेत.

योगी आदित्यनाथ सरकारचे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, ई-पेंशन पोर्टलची सुरुवात; पेंशनसाठी ऑफीसचे खेटे टळणार
योगी आदित्यनाथImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 6:30 AM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) सरकारकडून उत्तरप्रदेशच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक मे अर्थात कामगार (Labour Day) दिनाच्या दिवशी मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने एक मे रोजी ई-पेंशन पोर्टलची (E-Pension Portal) सुरुवात करण्यात आली आहे. या पोर्टचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे या पोर्टलच्या मदतीने सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या निवृत्तीनंतर पेंशन संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडता येणार आहेत. या पोर्टलमुळे पेंशन संबंधित प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल सोबतच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेंशन आणि इतर कामासांठी ऑफीसला वारंवार येण्याची गरज भासणार नसल्याचे उत्तर प्रदेश प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारमध्ये डिजिटलायजेशनला प्राधान्यक्रम दिला आहे. याच धर्तीवर हे पोर्टल चालू करण्यात आल्याचे देखील उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

पोर्टलचे लॉंचिंग झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश सरकारने डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा राज्यातील कोट्यावधी जनतेला झाला. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने प्रशासनामध्ये गतीमानता, सुसुत्रता आणि पारदर्शकता आली. प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञान वाढावे यासाठी सातत्याने सरकारचा प्रयत्न सुरू आहे. याच धरतीवर आता ई-पेंशन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पेंशन संबंधित कामे करण्यासाठी ज्या आडचणी येतात त्या दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने या पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. यो पोर्टलच्या मदतीने निवृत्त कर्मचारी घसबसल्या आपल्या पेंशन संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत.

पोर्टल कसे काम करणार?

उत्तर प्रदेशमधील सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी सहा महिने पेंशनसाठी या पेर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर सर्व कामं या विभागाशी संबंधित अधिकारी पूर्ण करणार आहेत. पेंशन साठी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर तीस दिवसांच्या आत हा अर्ज व्हेरिफाय केला जाणार आहे. त्यानंतर हा अर्ज पेंशन मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्याला पेंशन मंजूर झाल्याचा आदेश द्यावा लागणार आहे. या पेर्टलमुळे पेंशनची प्रक्रिया सोपी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.