AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business Idea: ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला बक्कळ पैसे कमवा

LED bulb business | एलईडी लाइटला एमिटिंग डायोड म्हणतात. LED बल्बचे आयुष्य साधारणपणे 50000 तास किंवा त्याहून अधिक असते, तर CFL बल्बचे आयुष्य फक्त 8000 तासांपर्यंत असते. विशेष बाब म्हणजे एलईडी बल्ब रिसायकल करता येतात. LEDs मध्ये CFL बल्ब प्रमाणे पारा नसतो, परंतु शिसे आणि निकेल सारखे घटक असतात.

Business Idea: 'हा' व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला बक्कळ पैसे कमवा
एलईडी बल्ब
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 1:03 PM
Share

नवी दिल्ली: व्यवसाय सुरू करताना त्याची मागणी आणि बाजारपेठ पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. अलीकडच्या काळात सरकारने स्टार्ट-अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एलईडी बल्ब बनवण्याचा हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत एलईडी बल्बची मागणी खूप वाढली आहे. हे बल्ब आल्यानंतर रोषणाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यासोबतच विजेचे बिलही आटोक्यात आले आहे. एलईडी बल्ब व्यवसायाच्या कल्पनेमुळे अनेकांना रोजगारही मिळाला आहे. ज्यांचे प्रशिक्षण शासनाकडून दिले जाते.

LED बल्ब दीर्घकाळ टिकतात

एलईडी लाइटला एमिटिंग डायोड म्हणतात. LED बल्बचे आयुष्य साधारणपणे 50000 तास किंवा त्याहून अधिक असते, तर CFL बल्बचे आयुष्य फक्त 8000 तासांपर्यंत असते. विशेष बाब म्हणजे एलईडी बल्ब रिसायकल करता येतात. LEDs मध्ये CFL बल्ब प्रमाणे पारा नसतो, परंतु शिसे आणि निकेल सारखे घटक असतात.

व्यवसाय सुरु करण्यासाठी काय कराल?

अगदी नाममात्र गुंतवणुकीत तुम्ही एलईडी बल्बचा व्यवसाय सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत हा सर्वोत्तम व्यवसाय मानला जातो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक संस्था एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण देतात. आता सर्वत्र स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबत एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्या प्रशिक्षणही देतात. त्यांच्याशीही संपर्क साधता येईल.

एलईडी बल्ब बनवण्याच्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला एलईडीचे बेसिक, पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-टेस्टिंग, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितले जाईल. जर तुम्हाला छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते फक्त 50,000 रुपयांमध्ये सुरू करता येईल. या कामासाठी तुम्हाला एखादे दुकान उघडण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्याही हा व्यवसाय आरामात सुरू करू शकता.

किती कमाई?

एक एलईडी बल्ब बनवण्यासाठी सुमारे 50 रुपये खर्च येतो आणि तो बाजारात 100 रुपयांना सहज विकला जातो. म्हणजेच एका बल्बवर दुप्पट नफा होतो. जर तुम्ही एका दिवसात 100 बल्ब बनवले तर थेट 5000 रुपये तुमच्या खिशात येतील. अशा परिस्थितीत, दरमहा 1.50 लाख रुपयांपर्यंत सहज कमाई होऊ शकते.

इतर बातम्या:

…म्हणून राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची गरज वाटत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा युक्तिवाद

…तर पेट्रोल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होईल, दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार – कराड

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने मोदी सरकारची ‘दिवाळी’; सरकारी तिजोरीत 1.71 लाख कोटींची भर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.