AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर पेट्रोल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होईल, दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार – कराड

पेट्रोल आणि डिझेल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagavat Karad) यांच्या वतीने देण्यात आली आहे. इंधनाचे दर कमी करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले

...तर पेट्रोल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होईल, दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार - कराड
Bhagwat Karad
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 12:00 PM
Share

औरंगाबाद –  केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त देशातील नागरिकांसाठी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेल आणखी 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagavat Karad)  यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिली आहे.

यावेळी बोलताना कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी कसे होतील यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात इंधनाचे दर आणखी सात रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी राज्यांना पत्र लिहिल्याची देखील माहिती कराड यांनी दिली आहे. भाजपाचे ज्या राज्यात सरकार आहे, तेथील सरकारनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. आता महाराष्ट्रातील पेट्रोल दर कमी करावेत यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केल्याने राज्यांचा व्हॅट कमी होतो, व्हॅट कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेल आपोआपच सात रुपयांनी स्वस्त होईल असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

पेट्रोल, डिझेलवरील Excise Duty म्हणजे नेमकं काय?

उत्पादन शुल्क नावाने अबकारी करदेखील ओळखला जातो. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे, जो एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर आकारला जातो. एखाद्या वस्तूचा निर्माता किंवा उत्पादक त्याच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क वसूल करतो. विशेष म्हणजे तो ग्राहकांकडून वसूल केला जातो. उत्पादक त्याच्या उत्पादनावर आकारले जाणारे उत्पादन शुल्क त्या वस्तूवर लावलेल्या उर्वरित करात जोडून गोळा करतो. त्यानंतर तुमच्या उत्पादनावरील ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काची रक्कम सरकारला सादर केली जाते. त्यामुळे शासनाला दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.

पेट्रोल, डिझेलचे आजचे दर 

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्वीच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या 

Petrol Diesel Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल, डिझेलवरील Excise Duty म्हणजे नेमकं काय?, ज्यातून सरकारची दररोज करोडोंची कमाई

मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेल स्वस्त, मुंबईत आता किंमत काय?

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.