Business Ideas: दीड लाखांत घरबसल्या ‘हा’ व्यवसाय सुरु करा; महिन्याला 25 हजारांची कमाई

Business Ideas | आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर निरोगी आरोग्यासाठी गुलकंद खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गुलकंद तयार करण्याच्या व्यवसायातून तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते. मात्र, या बिझनेससाठी चांगल्या मार्केटिंगची गरज आहे.

Business Ideas: दीड लाखांत घरबसल्या 'हा' व्यवसाय सुरु करा; महिन्याला 25 हजारांची कमाई
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:10 AM

नवी दिल्ली: सध्याच्या काळात कोरोनामुळे नोकऱ्या आणि थेट लोकांशी संबंध येणाऱ्या उद्योगांविषयी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एखादं दुकान टाकायचं किंवा नवा व्यवसाय सुरु करायचं म्हटलं तर सरकार कधी आणि कितीवेळा लॉकडाऊन लावेल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत बंद जागेत राहूनच एखादा उद्योग करणे हे फायद्याचे ठरेल.

अशा परिस्थितीत गुलकंद तयार करण्याचा व्यवसाय चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडे अनेक गोष्टींसाठी गुलकंदाचा वापर केला जातो. अगदी खाण्याच्या पानापासून मिठाईतही गुलकंदाचा वापर होतो. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर निरोगी आरोग्यासाठी गुलकंद खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गुलकंद तयार करण्याच्या व्यवसायातून तुम्हाला चांगली कमाई करता येऊ शकते. मात्र, या बिझनेससाठी चांगल्या मार्केटिंगची गरज आहे. तुम्ही चांगल्या दर्जाचा गुलकंद तयार करत असाल तर बाजारपेठेत त्याचा खप होऊ शकतो.

व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च?

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) गुलकंदच्या व्यवसायावर एक प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्प अहवालानुसार गुलकंद व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 1.50 लाख रुपये खर्च येतो. यात 24,000 रुपये भाड्याने आणि 50,000 रुपये उपकरणांसाठी खर्च होतात.

उपकरणांमध्ये गॅस स्टोव्ह, अॅल्युमिनियमची भांडी, मोठे चमचे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण भांडवली खर्च 74,000 रुपये इतका आहे. याशिवाय, 80,000 रुपयांचे भांडवल इतर गोष्टींसाठी आवश्यक असेल. अशा प्रकारे एकूण प्रकल्पाची किंमत 1.54 लाख रुपये आहे.

गुलकंदाला बाजारपेठेत वाढती मागणी

पान खाणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गुलकंदची मागणीही वाढली आहे. गुलकंदाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे. हे आपल्या आतड्यांसाठी खूप चांगले आहे, त्यामुळे आपली पचनप्रक्रिया सुधारते.

व्यवसायातून किती कमाई होते?

जर तुम्ही पूर्णपणे या व्यवसायात उतरलात तर तुम्ही वर्षाला साधारण 7.50 लाख रुपये किंमतीचा गुलकंद विकू शकता. उत्पादन खर्च आणि इतर खर्च वगळून तुम्हाला साधारण 2,58,000 रुपयांचा नफा मिळेल. म्हणजेच तुमचे मासिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल. तुम्ही भाड्याच्या जागेऐवजी तुमच्या घरात हा व्यवसाय सुरू केलात तर तुमचा नफा आणखी वाढेल. घरी व्यवसाय सुरू केल्यास एकूण प्रकल्प खर्च कमी होईल आणि नफा वाढेल.

इतर बातम्या:

Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.