बँक व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल, …तर सादर करावे लागणार पॅन कार्ड; नवे नियम 26 मे पासून लागू

| Updated on: May 12, 2022 | 10:36 AM

बँकेच्या संबंधित व्यवहारांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवे नियम येत्या 26 मे पासून लागू होणार आहेत.

बँक व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल, ...तर सादर करावे लागणार पॅन कार्ड; नवे नियम 26 मे पासून लागू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : बँक (bank) आणि पोस्ट ऑफीसमध्ये (Post Office) ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या पैशांच्या व्यवहारासंदर्भातील नियमांमध्ये केंद्र सरकार आणि भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने काही बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार जर एक आर्थिक वर्षात कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये वीस लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची रोकड जमा केल्यास पॅन कार्ड (PAN card) आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज CBDT ने इनकम टॅक्स संशोधन अधिनियम 2022 अनुसार बँकिंग व्यवहारासंबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमांची आधीसूचना दहा मे 2022 पासून जारी करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या नियमांची अमलबजावणी 26 मे पासून करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार आता बँकेत करंट खाते ओपन करण्यासाठी देखील पॅन कार्डची आवश्यकता असणार आहे. ज्या ग्राहकांचे पॅन ऑलरेडी बँक खात्याला लिंक आहे, त्यांना देखील बँकेत रोकड जमा करताना वरील नियमांचे पाल करावे लागणार आहे.

या बँकिंग व्यवहारांसाठी पॅन आणि आधारची डिटेल्स आवश्यक

एका आर्थिक वर्षात कोणत्याही एका बँकेच्या खात्यात, पतसंस्थेच्या खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफीसच्या खात्यामध्ये 20 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास तुम्हाला आधार आणि पॅन कार्डची डिटेल्स सादर करणे बंधनकारक असणार आहे.

जर तुम्ही एका आर्थिक वर्षात कोणत्याही एका बँकेच्या खात्यात किंवा पोस्टाच्या खात्यामधून वीस लांखापेक्षा अधिक रकमेची उलाढाल केली किंवा व्यवहार केला तरी देखील तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.

बँकेत किंवा पोस्ट ऑफीसमध्ये चालू आणि बचत खाते सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डची गरज असणार आहे.

समजा जर तुमचे पॅन ऑलरेडी बँक खात्याशी लिंक असेल आणि त्या खात्यातून जर एका आर्थिक वर्षात वीस लाखांपेक्षा अधिक व्यवहार झाला तरी देखील तुम्हाला बँकेकडे आधार आणि पॅनची माहिती सादर करावी लागणार आहे.

चालू आणि बचत खाते ओपन करण्यासाठी पॅनची आवश्यकता

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजच्या नव्या नियमानुसार जर तुम्हाला एखाद्या बँकेत चालू किंवा बचत खाते ओपन करायचे असेल तर तुम्हाला संबंधित बँकेला तुमच्या आधार आणि पॅनची डिटेल्स द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे समजा तुमचे एखाद्या बँकेत खाते आहे. त्या खात्याला ऑलरेडी तुमचे पॅन लिंक आहे, मात्र तरी देखील तुम्हाला वरील नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजच्या वतीने देण्यात आली आहे.