कोरोनाची लस घेतल्यावर रेस्टॉरंटस, McDonals’s मध्ये डिस्काऊंट, बँकेत जास्त व्याजदर, जाणून घ्या सर्वकाही

Covid Vaccination | लस घेतलेल्या  (Vaccination ) व्यक्तींना मॉल, रेस्टॉरंटस आणि बँकांकडूनही विशेष फायदे दिले जात आहेत. लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.

कोरोनाची लस घेतल्यावर रेस्टॉरंटस, McDonals’s मध्ये डिस्काऊंट, बँकेत जास्त व्याजदर, जाणून घ्या सर्वकाही
कोरोना लसीकरण

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना वाचवण्यासाठी सरकारने सध्या लसीकरण मोहीम जोरात चालवली आहे. आतापर्यंत अनेकांना लस मिळाल्यामुळे ते काहीप्रमाणात सुरक्षित झाले आहेत. तर दुसरीकडे लस घेतलेल्या  (Vaccination ) व्यक्तींना मॉल, रेस्टॉरंटस आणि बँकांकडूनही विशेष फायदे दिले जात आहेत. लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. (Bumper offers for Corona vaccinated people get chance to discount savings and extra intrest rae)

McDonals’s कडून 20 टक्के डिस्काऊंट

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या McDonals’s कडून उत्तर आणि पूर्व भारतात ‘We Care’ अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना 500 रुपयांच्या ऑर्डरवर 20 टक्के सूट दिली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना आपले लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागत आहे.

दिल्लीतील रेस्टॉरंटसमध्ये लस घेतलेल्या व्यक्तींना सूट

दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राम परिसरात अनेक रेस्टॉरंटसकडून ग्राहकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी लसीकरण झालेल्या लोकांना विशेष डिस्काऊंट दिली जात आहे.

सेंट्रल बँकेत जास्त व्याजदर

कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना सेंट्रल बँकेत ठेवीवर जास्त व्याजदर दिला जात आहे. त्यासाठी गेल्या महिन्यापासून ‘इम्यून इंडिया डिपॉजिट स्कीम’ (Immune India Deposit Scheme) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 1111 दिवसांच्या ठेवीसाठी 5.35 टक्के इतके व्याज दिले जात आहे. इतर ग्राहकांसाठी हाच व्याजदर 5.10 टक्के इतका आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत सुरु राहील.

डिश टिव्हीवर फ्री स्लॉट

कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना डिश टीव्हीवर विशेष फायदा मिळत आहे. त्यासाठी ग्राहकांना आपले कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर ग्राहकांना एका दिवसाचा स्लॉट मोफत दिला जात आहे.

इतर बातम्या:

वैष्णोदेवीचा फोटो असलेली नाणी करु शकतात तगडी कमाई, एका नाण्याच्या बदल्यात मिळतील 10 लाख रुपये

आरोग्य यंत्रणेनं करुन दाखवलं, दिवसभरात 80 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम

ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; Flash Sale होणार बंद

(Bumper offers for Corona vaccinated people get chance to discount savings and extra intrest rae)

Published On - 8:10 am, Tue, 22 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI