उन्हाळाच्या सुटीमध्ये परदेशी जाण्याचा प्लॅन करताय? मग ‘हे’ चार क्रेडिट कार्ड वाचवू शकतात तुमचे पैसे

उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्या असतात. तुम्ही जर या सुट्यांच्या काळात कुठे परदेशात फिरण्याचा प्लॅन बनवणार असाल तर तुमच्यासाठी असे क्रेडिट कार्ड उपयोगी ठरू शकतात जे कमी फोरेक्स फीमध्ये (Forex Fee) चांगली सेवा देतात.

उन्हाळाच्या सुटीमध्ये परदेशी जाण्याचा प्लॅन करताय? मग 'हे' चार क्रेडिट कार्ड वाचवू शकतात तुमचे पैसे
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपयेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 2:32 PM

उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्या असतात. तुम्ही जर या सुट्यांच्या काळात कुठे परदेशात फिरण्याचा प्लॅन बनवणार असाल तर तुमच्यासाठी असे क्रेडिट कार्ड उपयोगी ठरू शकतात जे कमी फोरेक्स फीमध्ये (Forex Fee) चांगली सेवा देतात. परदेशात जर तुम्ही क्रेडिट कार्डने (Credit card) पेमेंट करणार असाल तर तुमच्याकडून त्याबदल्यात बँका परकीय चलन मार्कअप शुल्क आकारतात. हे शुल्क तुमच्या व्यवहाराच्या रकमेच्या 3.5 टक्क्यांपर्यंत असू शकते. मात्र असे देखील काही क्रेडिट कार्ड आहेत, ज्या क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही परदेशात पेमेंट केल्यास कमी मार्कअप शुल्क आकारले जाते. परेशी सहलींमध्ये तुम्ही अशाप्रकारच्या कार्डचा वापर करून निश्चितपणे पैशांची बचत करू शकता. जे लोक वेळोवेळी परदेशी सहलीचे आयोजन करत असतात त्यांच्यासाठी अशा प्रकारचे क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरू शकतात. पैसाबाजारकडून अशेच काही कार्ड सूचीबद्ध करण्यात आले आहेत, त्याची आपण आज माहिती घेणार आहोत.

  1. एचडीएफसी क्रेडिट कार्ड : एचडीएफसीचे Regalia Credit Card हे आपल्या ग्राहकांना अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये मोठी सूट देते. या कार्डचा वापर केल्यास तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करू शकता. हे कार्ड दीडशे रुपयांच्या रिटेल खरेदीवर चार रिवॉर्ड्स पॉइंट देते, सोबतच फॉरेन करेंसी मार्कअप फीमध्ये देखील केवळ दोन टक्केच शुल्क आकारले जाते.
  2. एसबीआय कार्ड : एसबीआय कार्ड तुम्हाला एलिट ऑफर्स देते. ज्यामुळे तुम्हाला फूड, डिपार्टमेंटल स्टोअर आणि किराणा मालाचे बिल या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केल्यास 5 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. सोबतच . ट्रायडेंट प्रिव्हिलेज मेंबरशिप आणि क्लब विस्तारा मेंबरशिप देखील या कार्डसोबत दिली जाते. या कार्डचे विदेशी चलन मार्कअप शुल्क अवघे 1.99 टक्के इतके आहे.
  3. IndusInd Legend: क्रेडिट कार्ड : हे देखील एक चांगले आणि फायदेशी क्रेडिट कार्ड आहे. जर तुम्ही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काही खरेदी केली आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिल दिले तर तुम्हाला प्रत्येक 100 रुपयांसाठी 2 रिवॉर्ड पॉइंटस मिळतो. तसेच या कर्डधारकांना देशातील अनेक मोठ्या हॉटलेमध्ये डिसकाऊंट देखील मिळतो. या कर्डाची फॉरेन करेंसी मार्कअप फी अवघी 1.8 टक्के इतकी आहे.
  4. एचडीएफसी डाइनर्स क्लब ब्लॅक क्रेडिट कार्ड : हे एक सर्वोत्तम क्रेडिट कार्ड आहे, या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला प्रत्येक खरेदीवर पाच रिवॉर्ड पॉइंट मिळतात. तसेच या कार्डधारकांना फोर्ब्स, झोमॅटो प्रो टाईम्सची मेंबरशिप देखील देण्यात येते. तुम्ही या क्रेडिट कार्डचा वापर करून पैशांची बचत करू शकता.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.