AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांची चिंता मिटली; आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 डिसेंबरपर्यंत वाढवली

EPFO | यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते.

नोकरदारांची चिंता मिटली; आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 डिसेंबरपर्यंत वाढवली
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 12, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे. (epfo extened deadline to seed aadhar card with pf uan no till 31 December 2021)

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?

स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.

पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द

पॅनकार्ड आधार कार्डासोबत लिंक न केल्यास भविष्यात तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पॅनकार्ड (Pancard) आधारशी न जोडल्यास ते रद्द होईल. तसेच तुम्हाला 1000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. (If you not link pancard to Aadhar card then it will get canclled after 30 June 2021)

सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे तुम्ही पॅनकार्ड आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे.

संंबंधित बातम्या:

नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली