AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return | कराच्या परीघात नसाल तरी भरा रिटर्न! फायदा जाणून म्हणाल काम तर एकदम बेस्ट झालं

Income Tax Return | कर्जासाठी हातात भक्कम पुरावा हवाय का? तर त्यासाठी प्राप्तिकर रिटर्न भरणे गरजेचे आहे.

Income Tax Return | कराच्या परीघात नसाल तरी भरा रिटर्न! फायदा जाणून म्हणाल काम तर एकदम बेस्ट झालं
सुलभ कर्ज मंजुरीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 12:40 PM

Income Tax Return | तुम्ही म्हणालं उगा कशाला या झंझाटात टाकताय? उत्पन्नचं तोकडं आहे. 2.50 लाखांच्या आत आहे. कराच्या परीघात बसत नाही. मग प्राप्तिकर रिटर्न (ITR)कशाला भरायचा? तर टीडीएस कपातीवर (TDS Deduction) परतावा घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांच्या वर असायला हवे. पण या उत्पन्न मर्यादेत तुम्ही बसत नसाल म्हणजे अडीच लाख रुपयांच्या आत उत्पन्न जरी असले तरी तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरणे तुमच्या फायद्याचं ठरू शकते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न (Annual Income) प्राप्तिकर मर्यादेपेक्षा कमी आहे अशा कमावत्या व्यक्तींसाठी वेळेत आयकर रिटर्न भरण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात त्यात फायदा दडलेला आहे. आता तो फायदा काय आहे? प्राप्तिकर रिटर्न भरल्यास फायदा कसा होईल? हे आपण जाणून घेऊयात.

आता मुदत वाढ नाही

प्राप्तिकर भरण्याची अंतिम मुदत विभागाने 31 जुलै निश्चित आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वेळा करदात्यांच्या सोयीसाठी मुदत वाढवण्यात आली होती. पण, यंदा ही मुदत वाढ न देण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. महसूल सचिव (Revenue Secretary) तरुण बजाज यांनी आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत करदात्यांना आता नियोजित वेळेतच आयकर भारावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

5.10 कोटींहून अधिक सजग करदाते

आयकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै 2022 रोजीपर्यंत 5.10 कोटींहून अधिक करदात्यांनी प्राप्तिकर रिर्टन भरला आहे. ट्विट करुन खात्याने याविषयीची माहिती दिली आहे. तसेच खात्याने आज कर भरण्याचा शेवटचा दिवस असल्याचे स्मरण ही करदात्यांना करुन दिले आहे. त्यानंतर कारवाईला करदात्यांना सामोरे जावे लागणार आहे.

पगारदार व्यक्तीने आयकर भरणे आवश्यक

सरकारच्या नियमानुसार 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांवर शून्य कर आकारला जातो, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा पगारदार व्यक्तींना कर भरणे गरजेचे नसते. त्यांना आयटीआर भरणे आवश्यक नाही. पण तज्ज्ञांचा सल्ला ऐकाल तर त्यांच्या म्हणण्यानुसार हा तुमचा गोड गैरसमज आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीने आयकर विवरण भरणे आवश्यक आहे. जर कमी पगार असूनही तुम्ही आयकर रिटर्न भरला तर त्याचे अनेक फायदे आहेत.

काय आहेत फायदे

ज्यांचे उत्पन्न वा ज्या पगारदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनी आयकर रिटर्न भरल्यास, त्याला शुन्य (NIL) आयटी रिटर्न भरणे म्हणतात. त्याचा फायदा कर्ज घेताना तुम्हाला होता. गृहकर्ज घेताना, वाहन अथवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना त्याचा फायदा होईल. बँक किंवा कर्ज देणाऱ्या वित्तीयसंस्थेकडून प्राप्तिकर रिटर्न मागितले जाते. तुम्ही आयटी रिटर्न भरल्याचे दाखवल्यास तुमचे कर्ज प्रकरण लवकर मंजूर होते.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....