August Bank Holiday | राष्ट्रीय उत्सवासह ऑगस्ट महिन्यांत सणांचा राबता, किती दिवस बंद राहतील बँका?

August Bank Closed Holiday | ऑगस्ट महिन्यापासून भारतीयांचे विविध सण उत्सव सुरु होतात. या महिन्यांत स्वातंत्र्य दिनासह अनेक उत्सव ही साजरे होतात. यादिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे.

August Bank Holiday | राष्ट्रीय उत्सवासह ऑगस्ट महिन्यांत सणांचा राबता, किती दिवस बंद राहतील बँका?
ऑगस्ट महिन्यात बँका बंदImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 11:23 AM

August Bank Holiday News | ऑगस्ट (August) महिन्यापासून भारतीयांचे विविध सण उत्सव सुरु होतात. या महिन्यांत स्वातंत्र्य दिनासह अनेक उत्सव ही साजरे होतात. ऑगस्ट महिन्यात देशाचा स्वातंत्र्य दिन हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण याच महिन्याच्या मध्यात येतो. महाराष्ट्रात तर गणेशोत्वसाची धूम याच महिन्यात असते. संपूर्ण राज्यात गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणात भारतीयांच्या मनात भक्ती भाव दाटून येतो. तर स्वातंत्र्य दिनामुळे देशप्रेमाला भरते चढते. या महिन्यात अनेक सुट्या असल्याने बँकांना सुट्टी (Bank Holiday) असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्टमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (List of Bank Holidays) जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण 13 दिवस (दुसरा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता) बँका बंद राहतील. स्वातंत्र्य दिन 2022, रक्षाबंधन 2022, जन्माष्टमी  आणि गणेश चतुर्थी  यांसारखे मोठे सण या महिन्यात येतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित काही काम (Working of Bank) असेल तर सुट्टी नक्की तपासा आणि त्यानुसार बँकेत जाण्याची योजना आखा.

बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाइन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.

हे सुद्धा वाचा

अशा मिळतात सुट्या

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

राज्यानुसार सुट्ट्या

या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List 2022) बँकिंगच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे केल्या जाणाऱ्या सणांच्या किंवा संबंधित राज्यांमध्ये खास प्रयोजनानुसार सुट्टी जाहीर करण्यात येते.

पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in August 2022)

1 ऑगस्ट : द्रुपका शे-जी उत्सव ( फक्त सिक्कीममध्येच सुट्टी) 7 ऑगस्ट : पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी) 8 ऑगस्ट : मोहरम (जम्मू-काश्मीर बँक सुट्टी) 9 ऑगस्ट : मोहरम (आगरतळा, अहमदाबाद, ऐजॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील) 11 ऑगस्ट : रक्षाबंधन (देशभरात सुट्टी) 13 ऑगस्ट : दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी) 14 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 15 अगस्त: स्वतंत्रता दिन 16 ऑगस्ट : पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी) 18 ऑगस्ट : जन्माष्टमी (देशभरात सुट्टी) 21 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 28 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 31 ऑगस्ट : गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकातील बँकांना सुट्टी)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.