AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना राहा सावधान, ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Online Shopping | सर्वप्रथम तुम्ही सर्व पोर्टलवर एकच पासवर्ड वापरत नसल्याचे सुनिश्चित करा. तुमचा पासवर्ड क्लिष्ट ठेवा आणि तुमच्या वैयक्तिक तपशीलाशी काहीही संबंध नसावा. तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, दर तीन महिन्यांनी तुमचा पिन क्रमांक बदला.

सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना राहा सावधान, 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
ऑनलाईन खरेदी
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 27, 2021 | 7:28 AM
Share

मुंबई: सणासुदीचा हंगाम सुरू असून दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. आजकाल अनेकजण ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. ई-कॉमर्सने भारतातील खरेदीचे वातावरण पूर्णपणे बदलले आहे. किराणा सामानापासून ते कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, लोक सर्व काही ऑनलाइन खरेदी करतात. ऑनलाइन खरेदी जलद आणि सोयीस्कर असताना, यामुळे तुम्हाला फसवणूक होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पासवर्ड आणि पिन क्रमांक

सर्वप्रथम तुम्ही सर्व पोर्टलवर एकच पासवर्ड वापरत नसल्याचे सुनिश्चित करा. तुमचा पासवर्ड क्लिष्ट ठेवा आणि तुमच्या वैयक्तिक तपशीलाशी काहीही संबंध नसावा. तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, दर तीन महिन्यांनी तुमचा पिन क्रमांक बदला. डिजिटल वॉलेटसाठीही तेच वापरावे. याशिवाय वेगवेगळे यूजर आयडी वापरा. यामुळे डेटा चोरी आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. युनिक यूजर आयडी तयार करण्यासाठी, पोर्टलच्या नावाचा वापर करा.

विश्वासार्ह संकेतस्थळांवरुन खरेदी करा

ऑनलाईन खरेदी ही शक्यतो विश्वासार्ह संकेतस्थळांवरुन करा. मोठी संकेतस्थळे उत्तम सुरक्षा प्रणाली पुरवतात. सामान्यत: केवळ व्हेरिफाईड विक्रेत्यांशी व्यवहार करतात. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात गुन्हेगार तुमच्या इनबॉक्समध्ये एखादी लिंक पाठवून तुम्हाला आमिष दाखवतात. याला फिशिंग म्हणतात. लिंक तुम्हाला एका बनावट वेबसाइटवर घेऊन जाईल ज्याचे डिझाइन सामान्य शॉपिंग पोर्टलसारखे आहे. त्यामुळे ई-मेलवर आलेल्या हायपरलिंकवर क्लिक करणे टाळा.

कोणत्याही ई-कॉमर्स रिटेल विक्रेत्याकडे सुरक्षित सर्व्हरवर चांगली एनक्रिप्टेड वेब प्रेझन्स असते. अ‍ॅड्रेस बारवरील सुरक्षित चिन्ह पहा, जे URL च्या आधी आहे. याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की वेबसाइट व्यवहारांसाठी सुरक्षित आहे. अॅप्स डाउनलोड करतानाही, ते Google Play Store किंवा App Store वरून पडताळले असल्याची खात्री करा.

पेमेंट ऑप्शन

बँकांमध्ये अधिक चांगली सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या बँकांचे मोबाइल अॅप्स सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतात जे सतत अपग्रेड केले जातात. त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्येही चांगली सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे पेमेंटसाठी या कार्डांचा वापर करावा. तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसोबत तुमच्या स्मार्टफोनलाही अँटी-व्हायरसी गरज असते. स्मार्टफोनवरून खरेदीचे प्रमाण वाढल्याने फसवणूक होण्याची शक्यताही वाढली आहे. गुन्हेगार तुमचे सिम, खाते, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील क्लोन करु शकतात.

संबंधित बातम्या:

बोगस संकेतस्थळावर चुकूनही सर्फिंग करु नका, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

अमेरिकेत MBA, भारतात शेकडो लोकांची ऑनलाईन फसवणूक, भामट्याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सावधान! नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक, वसईत दोन लाखांचा गंडा

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!