AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोगस संकेतस्थळावर चुकूनही सर्फिंग करु नका, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

स्पूफिंगमध्ये एखाद्याला जाळ्यात ओढण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार केले जाते. बनावट वेबसाइट मूळ संकेतस्थळासारखी दिसण्यासाठी सायबर गुन्हेगार वेबसाइटचे योग्य नाव, लोगो, ग्राफिक्स आणि कोड वापरतात. | Fake website

बोगस संकेतस्थळावर चुकूनही सर्फिंग करु नका, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
बनावट संकेतस्थळ
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 7:18 AM
Share

नवी दिल्ली: आजच्या युगात बहुतांश लोक बँकेशी संबंधित कामासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनची मदत घेतात. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगारही याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. फिशिंग किंवा स्पूफिंगच्या माध्यमातून सर्रास ऑनलाईन फसवणूक होते. आहे. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

स्पूफिंग म्हणजे काय?

स्पूफिंगमध्ये एखाद्याला जाळ्यात ओढण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार केले जाते. बनावट वेबसाइट मूळ संकेतस्थळासारखी दिसण्यासाठी सायबर गुन्हेगार वेबसाइटचे योग्य नाव, लोगो, ग्राफिक्स आणि कोड वापरतात. ते आपल्या ब्राउझर विंडोच्या शीर्षस्थानी अॅड्रेस फील्डमध्ये दिसणारी URL कॉपी करू शकतात. यासह, ते उजव्या हाताला दिलेले पॅडलॉक आयकॉन देखील कॉपी करतात.

हॅकर्स तुम्हाला ईमेल पाठवतात. तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित माहिती अपडेट किंवा कन्फर्म करण्यास सांगतात. हे खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्याच्या उद्देशाने केले जाते. या तपशीलांमध्ये तुमचा इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी, पासवर्ड, पिन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते क्रमांक, कार्ड सत्यापन मूल्य (सीव्हीव्ही) क्रमांक समाविष्ट आहे.

स्पूफिंगच्या माध्यमातून फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

* लक्षात ठेवा की बँक कधीही गोपनीय माहिती विचारत ईमेल पाठवत नाही. जर तुम्हाला तुमचा इंटरनेट बँकिंग सुरक्षा तपशील जसे की पिन, पासवर्ड किंवा खाते क्रमांक मागणारा ईमेल प्राप्त झाला, तर तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ नये.

* पेडलॉक चिन्ह तपासा. ते ब्राउझर विंडोमध्ये कुठेही पॅडलॉक चिन्ह दर्शवतात. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोररमध्ये, लॉक चिन्ह ब्राउझर विंडोच्या तळाशी उजवीकडे दिसते. सुरक्षा संबंधित तपशील तपासण्यासाठी साइटवर डबल क्लिक करा.

* संकेतस्थळाची URL तपासा. वेब ब्राउझ करताना, URL “http” ने सुरू होतात. तथापि, सुरक्षित कनेक्शनमध्ये, पत्ते https सह सुरू होतात. https म्हणजे पेज सुरक्षित आहे. येथे सर्व्हरवर पाठवण्यापूर्वी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड एनक्रिप्ट केला जाईल.

इतर बातम्या:

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून 9488 कोटींचं दिवाळी गिफ्ट, आता किती पगार मिळणार?

फेसबुक, गुगल आणि अ‍ॅपलमध्ये गुंतवणूक करा, 29 ऑक्टोबरपर्यंत संधी, जाणून घ्या सर्वकाही

वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलची गरज लागणार नाही, 60 ते 62 रुपयांत मिळणार ‘हे’ इंधन, वाचा नितीन गडकरींचा प्लॅन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.