7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून 9488 कोटींचं दिवाळी गिफ्ट, आता किती पगार मिळणार?

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा मिळेल. महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर 9488 कोटींचा भार पडणार आहे. | da hike 3 percent

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून 9488 कोटींचं दिवाळी गिफ्ट, आता किती पगार मिळणार?
अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 6:37 AM

नवी दिल्ली: मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे. केंद्रीय नोकरदार आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ प्रस्तावित होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरुन वाढून 31 टक्के इतका झाला आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिल्लीत ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा मिळेल. महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर 9488 कोटींचा भार पडणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?

* जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर तुम्हाला आता 5030 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. सध्या डीए मूळ वेतनाच्या 28% आहे. आता त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजेच आता तुम्हाला 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल अर्थात आता तुम्हाला 5,580 रुपये डीए मिळेल. * केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये असल्यास, DA 540 रुपयांनी वाढेल. तुमचा मूळ पगार जितका जास्त तितका जास्त डीए येईल.

1 जुलैलाही महागाई भत्त्यात झाली होती वाढ

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात (डीए) 11 टक्के वाढ मंजूर केली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता

केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आलाय, कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव केंद्र सरकारने HRA वाढवून 27% करण्याचा निर्णय घेतला.

हा आदेश जारी करताना सरकारने म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) आणि DA मध्ये त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे वाढ केली जाईल. सध्याचा नियम म्हणतो की, डीएची रक्कम बेसिक सॅलरीच्या 25 टक्क्यांहून अधिक झाल्यास HRA 3% ने वाढतो. 2017 मध्ये हा नियम करण्यात आला. कर्मचाऱ्याचा डीए त्याच्या बेसिक सॅलरीच्या 25% पेक्षा जास्त असेल त्याच्या HRA मध्ये बदल केला जाईल. त्यानुसार अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा एचआरए जाहीर केला होता.

एचआरए आणि वेतन एकत्र देऊन सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी बोनसचा लाभ देईल किंवा दोन्हीचे पैसे वेगवेगळे मिळतील, याबाबत कोणताही शासकीय निर्णय समोर आलेला नाही. परंतु सणासुदीचा काळ लक्षात घेता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना या ‘डबल बोनस’चा लाभ देऊ शकते. एचआरएचे पैसे वाढीव दराने मिळाल्याने पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट

दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल, कंपनी कायद्यात येऊ शकते पेन्शनचे काम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.