AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Freecharge ची खास Pay Later सुविधा, कसं करणार काम?

फ्री चार्जने नुकतंच ग्राहकांसाठी 'Pay Later' ही सेवा सुरु केली आहे. (Freecharge launches ‘Pay Later’ service)

Freecharge ची खास Pay Later सुविधा, कसं करणार काम?
freecharge
| Updated on: May 27, 2021 | 11:03 AM
Share

मुंबई : फ्रीचार्ज (Freecharge) ने नुकतंच ग्राहकांसाठी एक नवीन सेवा बाजारात आणली आहे. याद्वारे तुम्ही कोणत्याही बँकेच्या कार्डाशिवाय बिल भरु शकता. फ्री चार्जने नुकतंच ग्राहकांसाठी ‘Pay Later’ ही सेवा सुरु केली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना बिल भरणं सोपं होणार आहे. यात तुमच्या महिन्याचा सर्व खर्च एकत्र जोडला जाईल आणि महिन्याच्या शेवटी तुम्ही हे सर्व बिल एकत्र भरु शकता. ही सेवा फक्त फ्रीचार्जवर उपलब्ध होणार असून त्यासोबतच 10 हजार ऑनलाईन आणि ऑफलाईन कंपनीचे व्यापारी देखील ही सुविधा वापरु शकणार आहेत. (Freecharge launches ‘Pay Later’ service for customers know all the details)

‘पे लेटर’ सेवेचा वापर करून ग्राहक त्यांचे विजेचे बिल, मोबाईल रिचार्ज, फूड ऑर्डर, औषधांचा खर्च, ऑनलाईन किराणा सामान मागवू शकतात. यासाठी कोणत्याही कार्डची आवश्यकता भासणार नाही. इतर अनेक डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर व्यवहार करण्यासाठी कार्ड नंबर लक्षात ठेवणे गरजेचे असते. तो नंबर टाकल्यानंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होतो.

मात्र फ्रीचार्जच्या पे लेटर सेवा ही पूर्णपणे वेगळी आहे. ‘पे लेटर’ या सेवेसाठी तुम्हाला कोणातीही कार्ड नंबर लक्षात ठेवण्याची गरज भासत नाही. तसेच कार्ड नंबर सेव्ह करण्याचीही गरज नाही. विशेष म्हणजे वॉलेट रिलोड करणे किंवा ओटीपी यासारख्या गोष्टींची परवानगी आवश्यक नसते.

कसं करणार काम?

या नव्या सुविधेसाठी ग्राहकाला पे लेटरवर जावं लागेल. यात ग्राहकांना दर महिना 5 हजार रुपयांची क्रेडीट मर्यादा मिळते. तुमच्या खर्चावर ही मर्यादा भविष्यात वाढवलीही जाऊ शकते. ही मर्यादा ग्राहकांच्या प्रोफाईलनुसार वाढणार आहे. पे लेटर या नव्या सेवेच्या माध्यमातून ग्राहक सहजपणे त्यांचे छोटे आर्थिक खर्च भागवू शकतात.

याद्वारे मोबाईलद्वारे पेमेंट करताना ऑनलाईन किंवा ऑफलाईन करु शकता. त्यासाठी तुम्हाला रोख किंवा कार्डची गरज भासणार नाही. तुम्ही या सेवेचा उपयोग केल्यानंतर त्या बदल्यात व्याजाची काही रक्कम घेतली जाऊ शकते. दरम्यान ही सेवा सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रोसेसिंग फी ची आवश्यकता नाही. मात्र तुमच्याकडून जो व्याज घेतला जाईल, तो ग्राहकांच्या फ्रीचार्ज वॉलेटमध्ये कॅशबॅकच्या माध्यमातून परत दिला जाईल. यानंतर तुम्ही ते पैसे वापरु शकता.

वेळेवर बिल भरणे गरजेचे

मात्र या सेवेत ग्राहकांनी एका महिन्यात घालवलेली रक्कम एकाच वेळी परत द्यावी लागेल. त्याची थकबाकी ठेवण्याची परवानगी कंपनीकडून देण्यात येत नाही. दर महिन्याच्या 5 तारेखपर्यंत तुम्हाला फ्री चार्जचे बिल भरावे लागेल. जर तुम्ही हे बिल पेमेंट करण्यास उशीर केला तर तुम्हाला दर दिवसाला 10 रुपये आकारले जातील.

तसेच जर तुम्ही वेळेवर पैसे चुकवले नाहीत तर तुम्हाला फ्री चार्जचे पे लेटर सेवा वापरताना अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच उशिरा बिल भरल्यास तुम्हाला लेट फी आकारली जाईल. तसेच तुमचा सीआयबीआयएल स्कोअरही खराब होईल. (Freecharge launches ‘Pay Later’ service for customers know all the details)

संबंधित बातम्या : 

आधार कार्डशी संबंधित तक्रार करायची? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Bitcoin च्या भावात घसरण सुरुचं, जगातील 10 क्रिप्टोकरन्सीचे दर वाचा एका क्लिक वर

IRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.