AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती गॅस सिलेंडर, पेन्शन स्कीम, जीवन प्रमाणपत्र…1 डिसेंबरनंतर काय-काय बदलणार ?

हे सर्व बदल सर्वसामान्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे या नियमांपासून अवगत राहणे गरजेचे आहे. ३० नोव्हेबरच्या आधी आपली कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

घरगुती गॅस सिलेंडर, पेन्शन स्कीम, जीवन प्रमाणपत्र...1 डिसेंबरनंतर काय-काय बदलणार ?
New Rules from December 1
| Updated on: Nov 29, 2025 | 9:45 PM
Share

नवी दिल्‍ली: 1 डिसेंबर पासून दैनंदिन आर्थिक गोष्टीचे नियमात बदल होणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसांवर होणार आहे. त्यात नोकरदार, सरकारी कर्मचारी, पेन्शनर्स यांच्यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळे या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत तुम्हाला काही कामे उरकावी लागणार आहेत. अन्यथा दंड किंवा सेवेत खंड येऊ शकतो.

चला तर या नियमांसंदर्भात पाहूयात..

सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम ( यूपीएस ) मध्ये सामील होण्याची शेवटची संधी ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. जे लोक नॅशनल पेन्शन सिस्टीम ( एनपीएस ) मधून यूपीएसमध्ये जाऊ इच्छीत आहेत. त्यांना ऑनलाईन वा त्यांच्या नोडल ऑफिसरद्वारे ही प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख

३० नोव्हेंबरपर्यंत पेन्शनर्सना जीवन प्रमाणपत्र जमा करणे गरजचे आहे, पेन्शन विनाविलंब मिळण्यासाठी हे जीवनप्रमाणपत्र देणे गरजेचे असते. हे प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने वा बँक/ पोस्ट ऑफीसात जाऊन जमा करता येते. असे तर केले नाही तर पेन्शन तोपर्यंत थांबेल जोपर्यंत तुम्ही यास व्हेरीफाय करत नाही.

टॅक्स फायलिंग संदर्भातील महत्वाची तारीख

टॅक्स भरणाऱ्यासाठी देखील ३० नोव्हेंबरची तारीख खूप महत्वाची आहे. हाय व्हॅल्यू ट्राक्झंशनवर टीडीएसची माहिती याच तारखेला द्यावी लागते. यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टीडीएस कपातीचे विवरण सामील आहे. जे सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S अंतर्गत येते. ज्या कंपन्यांवर ट्रान्सफर-प्रायसिंग (आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये किंमतींचे निर्धारण ) चे नियम लागू होतो. त्यांनाही याच दिवशी आपला रिपोर्ट जमा करावा लागतो. याशिवाय ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतीय सहायक कंपन्या आहेत. त्यांना फॉर्म 3CEAA भरावा लागणार आहे. या वेळ आणि मर्यादांचे पालन न केल्यास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वतीने दंड किंवा नोटीस जारी होऊ शकते.

घरगुती सिलेंडरच्या किंमती

१ डिसेंबरपासून घरगुती ( एलपीजी ) गॅसच्या किंमती देखील बदल होऊ शकतो. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कलांनुसार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत पाहून दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजीची किंमत निश्चित करते. गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या होत्या. परंतू, घरगुती ग्राहकांना आता नवीन किंमतीची वाट पाहावी लागणार आहे. हा बदल थेट घराच्या बजेटवर परिणाम करणारा आहे.

विमान इंधनातील किंमतीत बदल

याच प्रकारे एव्हीएशन टर्बाइन फ्युअल (एटीएफ) म्हणजे विमानात वापरले जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीत देखील १ डिसेंबरपासून बदल होणार आहे. एटीएफच्या किंमतीतील बदलाने एअरलाईन्सच्या परिचलनाच्या खर्चावर परिणाम होतो. याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या तिकीटांवर देखील होऊ शकतो. सध्या पर्यटनाचा मोसम असल्याने लोकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

हे सर्व बदल सर्वसामान्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे या नियमांपासून अवगत राहणे गरजेचे आहे. ३० नोव्हेबरच्या आधी आपली कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.