Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या भावात घसरण, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol & Diesel | पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या भावात घसरण, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:06 AM

मुंबई: देशातील आघाडीच्या इंधन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. शनिवारी जाहीर झालेल्या दरपत्रकानुसास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. दुसरीकडे आंतरराष्‍ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे. इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारीही घसरण दिसून आली.

कच्च्या तेलाचा वापर फक्त पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठीच नाही तर इतर अनेक उत्पादनांसाठी केला जातो. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमतीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असूनही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष कपात झालेली नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करत आपापल्या राज्यातील जनतेला आणखी स्वस्तात इंधन उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

मोठी बातमी: महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची महत्त्वाची बैठक

Petrol Diesel Price: आजपासून पंजाबमध्ये पेट्रोल 10 आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.