AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Price Today: इंधन करकपातीनंतर खनिज तेलाच्या भावात घसरण; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?

Petrol Diesel | जाणकारांच्या अंदाजानुसार तुर्तास तरी इंधन दरकपातीची शक्यता अवघड वाटत आहे. क्रूड उत्पादक देशांची संघटना OPEC+ च्या बैठकीत क्रुडचा पुरवठा हळूहळू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले की, बैठकीतील पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 2022 च्या अखेरीस दर महिन्याला उत्पादनात दररोज 4 लाख बॅरलने वाढ केली जाईल.

Petrol Price Today: इंधन करकपातीनंतर खनिज तेलाच्या भावात घसरण; पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार?
झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 05, 2021 | 10:38 AM
Share

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $85 वरून $81 प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे. गेल्या ४८ तासांत कच्चे तेल 5 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या यापुढेही इंधनाचे दर कमी करतील का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार तुर्तास तरी इंधन दरकपातीची शक्यता अवघड वाटत आहे. क्रूड उत्पादक देशांची संघटना OPEC+ च्या बैठकीत क्रुडचा पुरवठा हळूहळू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले की, बैठकीतील पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 2022 च्या अखेरीस दर महिन्याला उत्पादनात दररोज 4 लाख बॅरलने वाढ केली जाईल.

देशातील तीन सर्वात मोठ्या सरकारी कंपन्या HPCL, BPCL आणि IOC दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित करतात. कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची चलन आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमतीच्या आधारे या किमती ठरवल्या जातात.

पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

पेट्रोल, डिझेलवरील Excise Duty म्हणजे नेमकं काय?, ज्यातून सरकारची दररोज करोडोंची कमाई

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने मोदी सरकारची ‘दिवाळी’; सरकारी तिजोरीत 1.71 लाख कोटींची भर

देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण

Follow Us
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी