देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण

बालाघाटमध्ये पेट्रोलचा दर 120.06 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेल 109.32 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 117.71 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 107.13 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तफावत आहे.

देशातील 'या' जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 3:20 PM

नवी दिल्ली: मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अनुपपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर 121 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर प्रतिलीटर डिझेलची किंमत 110.29 रुपयांवर पोहोचली आहे. अनूपपूरमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 110.29 रुपये प्रतिलिटर झाला आहे, तर बालाघाटमध्ये पेट्रोलचा दर 120 रुपयांच्या पुढे गेला आहे.

छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या अनुपपूरच्या बिजुरी शहरातील पेट्रोल पंपचालक अभिषेक जैस्वाल यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत (शनिवारपर्यंत) इंधनाचे दर प्रति लिटर 36 पैसे (पेट्रोल) आणि 37 पैसे (डिझेल) वाढले आहेत. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या जबलपूर तेल डेपोतून पेट्रोलियम अनूपपूर येथून आणले जाते. त्यामुळे वाहतूक खर्च जास्त असल्याने राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत येथे महाग पडत असल्याचे अभिषेक जैस्वाल यांनी म्हटले.

सहा शहरांमध्ये पेट्रोल 120 रुपयांच्या पलीकडे

बालाघाटमध्ये पेट्रोलचा दर 120.06 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेल 109.32 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 117.71 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 107.13 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तफावत आहे. मध्य प्रदेशातील पन्ना, सतना, रीवा, शहडोल, छिंदवाडा आणि बालाघाटमध्ये पेट्रोलने आता 120 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

राजस्थानच्या गंगानगर आणि हनुमानगडमध्येही इंधनाने ही पातळी गाठली आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 121.52 रुपये आणि डिझेल 112.44 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याठिकाणी देशातील सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. 28 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर 25 वेळा वाढवण्यात आले आहेत. तेव्हापासून पेट्रोल 8.15 रुपयांनी महागले आहे. त्याचवेळी 24 सप्टेंबरपासून आतापर्यंत 28 वेळा डिझेलच्या दरात वाढ झाली असून त्याचा दर 9.45 रुपयांनी वाढला आहे.

देशातील परिस्थिती काय?

देशातील इंधनाची सरासरी किंमत पेट्रोलसाठी प्रति लिटर 108.38 रुपये, डिझेलसाठी 101.78 रुपये प्रति लिटर, सीएनजीसाठी 40.4 रुपये प्रति लिटर, ऑटो गॅससाठी 40.4 रुपये प्रति लिटर, एलपीजीसाठी 940.95 रुपये प्रति 14.2 किलो आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल असलेल्या शहराबद्दल बोलायचे झाले तर ते राजस्थानमधील गंगानगर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 121.52 रुपये प्रति लिटर आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पुडुचेरी येथील कराईकलमध्ये आहे. येथे एक लिटर पेट्रोल 61.4 रुपयांना मिळत आहे. पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे.

राजस्थानमधील गंगानगर शहरात पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात उच्चांक कायम आहे. पेट्रोल 121 रुपयांच्या पुढे गेले आहे, तर डिझेल 112.44 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहे.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

Petrol Diesel Price: सलग पाचव्या दिवशी इंधन दरवाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.