विक्रेत्यांसाठी ‘जीईएम’ ठरलं वरदान, ऑनलाईन बाजारपेठेत मोठी वाढ, 43 लाखांहून अधिक विक्रेत्यांची नोंदणी

विक्रेत्यांसाठी 'जीईएम' ठरलं वरदान, ऑनलाईन बाजारपेठेत मोठी वाढ, 43 लाखांहून अधिक विक्रेत्यांची नोंदणी

देशातील सर्व विक्रेते एकाच छताखाली यावेत, त्यांना ऑनलाईन बाजारपेठ उललब्ध व्हावी यासाठी 2016 साली ई-मार्केटप्लेस अर्थात 'जीईएम' हे पोर्टल सुरू करण्यात आले. हे पोर्टल अल्पवधीत लोकप्रिय ठरले असून, या पोर्टलवर आतापर्यंत 43 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे.

अजय देशपांडे

|

May 24, 2022 | 2:30 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वातील सरकार केंद्रात (Central Government) सत्तेत येताच प्रशासनामध्ये अनेक बदल पहायला मिळाले. विविध योजना सुरू करण्यात आल्या, ज्याचा मोठा फयदा हा सर्वसामान्य जनतेला झाला. केंद्र सरकारने डिजिटलायझेशनवर (Digitization) भर दिला. त्याचा परिणाम म्हणजे आज जवळपास सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. भारतात पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने व्यापार सुरू आहे. मात्र या सर्व उद्योजकांना एक सशक्त डिजिटल माध्यम उपलब्ध व्हावे, व्यापारातील एकाधिकारशाही मोडीत निघावी या उद्देशाने केंद्रातील भाजपा सरकारने 2016 मध्ये गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस जीईएम (GeM) पोर्टल सुरू केले. या पोर्टलमुळे उद्योजकांना मोठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हे पोर्टल थोडक्यात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारखेच काम करते. जो योग्य आणि प्रमाणित उत्पादने तयार आणि विक्री करतो असा कोणताही विक्रेता या पोर्टलवर नोंदणी करू शकतो. त्यासाठी तुम्हाला जीईएमच्या अधिकृत साईटवर जाऊन नोंदणी करावी लागते. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर ईमेल आयडी अशा काही गोष्टीची आवश्यकता असते. वेबसाईटवर सर्व माहिती सबमिट केल्यानंतर या पोर्टलवर तुमचे अकाऊंट तयार होते.

43 लाखांहून अधिक विक्रेत्यांची नोंदणी

ई-मार्केटप्लेस अर्थात जीईएम हे व्यवसायिकांसाठी असलेले पोर्टल दिवसेंदिवस अधिल लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. यावर नोंदणी करणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. या पोर्टला सध्या स्थितीमध्ये 43 लाखांहून अधिक विक्रेते जोडले गेलेले आहेत. तसेच या पोर्टलवर 55 लाखांहून अधिक उत्पादने आणि सेवा उपलब्ध आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून 2016 पासून ते आतापर्यंत 2.48 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.

महिला बचत गटांचा फायदा

ई-मार्केटप्लेस अर्थात जीईएममुळे महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. महिला उद्योजग आणि महिला बचत गट हे जीईएमवर आपल्या वस्तुंची नोंदणी करतात. जीईएमसोबत लाखो व्यवसायिक जोडले गेल्यामुळे या बचत गटाच्या उत्पादनाची मागणी वाढते. मागणी वाढल्याने विक्रीत देखील मोठी वाढ होते. सोबतच हे बचत गट आपले उत्पादन थेट सरकारच्या विविध विभागांना देखील विकू शकतात.

स्टार्टअपसाठी वरदान

जीईएम पोर्टल हे स्टार्टअपसाठी वरदान ठरले आहे. एखादा स्टार्टअप सुरू झाल्यानंतर उद्योजकासमोर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळेल का नाही याची. योग्य बाजारपेठ मिळाल्यास स्टार्टअपचे मोठ्या व्यवसायात रुपांतर होऊ शकते. स्टार्टअपला हीच संधी जीईएम पोर्टच्या माध्यमातून मिळत आहे. या पोर्टलसोबत लाखो व्यवसायिक जोडले गेल्यामुळे स्टार्टअपला अगदी कमी प्रयत्नात चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. या पोर्टलवर आतापर्यंत 13,000 हून अधिक स्टार्टअप नोंदणी केली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें