आता मिस्ड कॉल देऊन मिळवा एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या संपूर्ण तपशील

| Updated on: Aug 09, 2021 | 10:44 PM

नवीन योजनेअंतर्गत नवीन ग्राहक स्वत:साठी 5 किलोचा दुसरा बॅकअप सिलिंडरदेखील घेऊ शकतात. त्यांना आणखी 14.2 किलोचे सिलिंडर घेणे बंधनकारक राहणार नाही.

आता मिस्ड कॉल देऊन मिळवा एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या संपूर्ण तपशील
आता मिस्ड कॉल देऊन मिळवा एलपीजी कनेक्शन
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर हे काम आता खूप सोपे झाले आहे. इंडियन ऑईल कॉपोर्रेशनने एक नंबर जारी केला आहे. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही सहज नवीन गॅस कनेक्शन मिळवू शकता. इंडियन ऑईलच्या 8454955555 या नंबरवर तुम्हाला मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. जर तुम्ही आयओसीचे विद्यमान ग्राहक असाल तर तुम्ही या नंबरवर मिस्ड कॉल देऊन रिफिल बुकिंग करू शकता. हे काम नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून करावे लागेल. (Get LPG connection now by making a missed call; know the full details)

इंडियन ऑईल कॉपोर्रेशनचे अध्यक्ष एस.एम. वैद्य यांनी सोमवारी हा नंबर लाँच केला आहे. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून नवीन गॅस कनेक्शन घेता येते. याशिवाय त्यांनी डोअर स्टेप डबल बॉटल कनेक्शन (डीबीसी) देखील सुरू केले आहे. जर तुमच्याकडे सध्या सिंगल बाटला कनेक्शन असेल, तर तुम्हाला नव्या योजनेंतर्गत सहजपणे डबल बाटला मिळवता येईल. सिंगलमधून डबलच्या योजनेमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया आता आणखीन सोपी करण्यात आली आहे. बाटला म्हणजे गॅस सिलेंडर हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

नव्या योजनेचा नेमका फायदा काय होणार

नवीन योजनेअंतर्गत नवीन ग्राहक स्वत:साठी 5 किलोचा दुसरा बॅकअप सिलिंडरदेखील घेऊ शकतात. त्यांना आणखी 14.2 किलोचे सिलिंडर घेणे बंधनकारक राहणार नाही. सध्याच्या घडीला इंडियन ऑईल कॉपोर्रेशन ही एकमेव कंपनी आहे, जी अशी सेवा देत आहे.

गॅस रिफिलसाठी मिस्ड कॉल सेवा जानेवारी 2021 पासूनच सुरू

इंडेन (Indane) म्हटले जाणाऱ्या इंडियन ऑईलने जानेवारी 2021 मध्येच गॅस रिफिलिंगसाठी टोल फ्री नंबर सुरू केला आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना नवीन गॅस सिलिंडर बुक करणे सोपे झाले आहे. आता मिस्ड कॉल देऊन नवीन गॅस कनेक्शन बुक करता येईल.

ग्राहकांना कमी त्रास होईल

एसएम वैद्य यांनी सांगितले की, ही सुविधा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बराच फायदा होईल. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सोयीसाठी सतत तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.

अशाप्रकारे रीफिल करा

एलपीजी रिफिल करण्यासाठी इंडेन ग्राहकांना भारत बिल पेमेंट सर्व्हिसेसचा (बीबीपीएस) वापर करता येईल. याशिवाय इंडियन ऑईल मोबाईल अ‍ॅपही वापरता येईल. ही सुविधा कंपनीच्या https://cx.indianoil.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ग्राहकांना 7588888824 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने बुकिंग आणि पेमेंट करता येते. 7718955555 या क्रमांकावर एसएमएस आणि आयव्हीआरएस सेवा उपलब्ध आहे. याशिवाय गॅस रिफिलिंगसाठी बुकिंगचा पर्याय अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्स आणि पेटीएमवरही उपलब्ध आहे. (Get LPG connection now by making a missed call; know the full details)

इतर बातम्या

लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य, तरुणाला अमरावतीकर माफ करतील?

सहा महिने लपवलं आता समोर आलं, करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती आहे का ?