लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य, तरुणाला अमरावतीकर माफ करतील?

विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. मात्र आरोपी हे खोटे पोलीस बनून पर्यटकांना अडवत होते. आरोपी पर्यटकांना दमदाटी देऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते.

लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य, तरुणाला अमरावतीकर माफ करतील?
लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य, तरुणाला अमरावतीकर माफ करतील?
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 10:37 PM

अमरावती : लष्कारात सैन्यात भरती व्हावं. आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या दुष्मनांच्या नांग्या ठेचाव्यात. सैनिक बनून देशासाठी काहितरी चांगली कामगिरी करुन दाखवावी, असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण काही व्यक्तींना चांगल्या पदाची, नोकरीची किंमत नसते. त्यांना आपल्या जबाबादारीची जाणीव नसते. ते चांगलं काही करत तर नाहीच पण इतरांना त्रास होईल, असं वागतात. त्यामुळे अशा इसमांना अद्दल घडवणं हाच योग्य पर्याय. अमरावतीत देखील असाच एक नराधम पोलिसांनी पकडला आहे. हा नराधम सैन्यात आहे. पण तरीही त्याने शरमेने मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित आरोपी हा सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो काश्मीरला पोस्टिंगला असतो. पण काही कारणास्तव तो विदर्भात त्याच्या गावी जसापूर येथे आला आहे. तो दारुच्या नशेत इतर दोन जोडीदारांना सोबत घेऊन मडकी गावाजवळ पर्यटकांना लुटताना रंगेहात पकडला गेला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी हा सैन्यात असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे ही माहिती खरी आहे का? याची शाहनिशा पोलिसांनी केली. पोलिसांना जेव्हा खरं माहिती पडलं तेव्हा ते देखील चक्रावून गेले. कारण आरोपी खरंच सैन्यात कार्यरत आहे.

पर्यटकांकडून बेकायदेशीर पैशांची वसुली

विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. मात्र आरोपी हे खोटे पोलीस बनून पर्यटकांना अडवत होते. आरोपी पर्यटकांना दमदाटी देऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. चिखलदराकडे जाताना चांदूरबाजार तहसील हद्दीत जसापूर गाव आहे. याच गावाचे ते तीन तरुण आहेत. यातील एक तरुण हा सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. पण तो आपल्या सहकाऱ्यांसह गावाजवळ दारुच्या नशेत मडकी गावाजवळ येणाऱ्या पर्यटकांना लुटत होता. त्याने अनेक पर्यटकांची वाहने थांबवली. त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुलीही केली.

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अखेर आरोपींच्या या कृत्याची माहिती पोलिसांना लागली. एका पर्यटकाने आरोपींच्या या कृत्याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात केली. तक्रारदाराच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं. विशेष म्हणजे आरोपींमधील एक तरुण हा लष्करात आहे. त्याच्या या कृत्याने आमरावतीकरांना देखील वाईट वाटलं आहे. त्यामुळे त्याच्या या कृत्यावरुन अमरावतीकर माफ करतील का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

हेही वाचा :

कोरोना महामारीतही लाचखोरी सुसाट, लाचलुचपत विभागाचे तब्बल 469 सापळे, शेकडो भ्रष्टाचारी गजाआड

चोर समजून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना मारहाण, गाडीवरही दगडफेक, नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.